BREAKING | शरद पवार यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील या घडामोडींवर आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

BREAKING | शरद पवार यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 4:21 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निवृत्तीच्या निर्णयावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. “हा शरद पवार यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक प्रश्न आहे. या स्टेजला यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. शेवटी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये बरंच मंथन चाललं आहे. एकदा नेमकी परिस्थिती काय आहे ते समोर आल्यावर बोलणं योग्य ठरु शकेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“या स्टेजला मी त्यावर बोलणं योग्य वाटत नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तांत्रिक मुद्दा आहे. पक्ष कोणत्या दिशेला जातोय ते माहिती नाही. आता यावेळी बोलणं योग्य वाटत नाही. आम्ही घडामोडींकडे लक्ष देऊन आहोत. योग्यवेळी प्रतिक्रिया देऊ”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“हे काय होतंय, का होतंय, या सर्व गोष्टी समोर येतील तेव्हा आम्ही यावर बोलणं योग्य ठरेल. शरद पवार यांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. पण मलाही पुस्तक लिहायचं आहे. मी त्यामध्ये योग्य गोष्टी लिहिणार आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय ते मी पुस्तकात लिहीण”, अशी सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

1967 पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. कार्यकर्त्यांनी त्यांनी  आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी घोषणाबाजी सुरु केली.

प्रदीर्घ कालावधीनंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला कदाचित अस्वस्थ वाटेल. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतलेला आहे.

शरद पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले.

मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो. हळहळू मी पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करायचे सांगितले. मग  महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क येत होते. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.