Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इतकी ‘बालबुद्धी’, तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील…’, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक मोठे इशारा दिले आहेत. त्यावर ठाकरे काय उत्तर देतात, ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

'इतकी ‘बालबुद्धी’, तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील...', देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 3:52 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पीएम केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड असं म्हणत निशाणा साधला. तसेच त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच ईडीकडून मुंबई महापालिकेकडून कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सुरु असलेल्या कारवाईवरुनही भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या या प्रत्येक टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला सविस्तर प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे”, असं देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. “ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘तुमचे कारनामे आता एकेक करीत उघड होणार’

“चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले? यावर काढा. मुंबईला कुणी लुटले यावर काढा. मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले? मराठी माणसाला कुणी ओरबाडले? 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते? यावर पुस्तक काढा. तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

हे सुद्धा वाचा

‘आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, पण…’

“आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही (नड्डे म्हणजे घसा). तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या.बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…”, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे अडचणीत येणार?

उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही नाही. त्यांच्या पक्षाच्या बऱ्याच लोकप्रतिनिधींनी वेगळा रस्ता धरला आहे. आता कोविड घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. ठाकरेंच्या जवळच्या माणसांच्या विरोधात कारवाई सुरु आहे. ईडीने आतापर्यंत टाकलेल्या धाडीत शेकडो कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुतकीआधी ठाकरे अडचणीत येतील का? अशी चर्चा सध्य सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. दुसरीकडे ईडी चौकशीविरोधात ठाकरेंच्या नेतृत्वात 1 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.