पत्रकारांनी प्रश्न विचारताच किरीट सोमय्या यांचा काढता पाय, पाहा VIDEO

अनिल परब (Anil Parab) यांनी आपला अनधिकृत बांधकामाशी काहीच संबंध नाही, असा म्हाडाकडून लेखी स्वरुपात पुरावा आणल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या प्रतिक्रियेवर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तिथून थेट काढता पाय घेतला.

पत्रकारांनी प्रश्न विचारताच किरीट सोमय्या यांचा काढता पाय, पाहा VIDEO
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 8:24 PM

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचं वांद्रे येथील म्हाडाच्या वसाहतीमधील ऑफिस जमीनदोस्त झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वेगळा दावा केला होता. अनिल परब यांच्या कार्यालयावर म्हाडाकडून (MHADA) कारवाई करण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. पण याबाबतची कारवाई आपल्याकडून करण्यात आलेली नाही, असं म्हाडाने अधिकृतपणे स्पष्ट केलं. त्यामुळे अनिल परब यांच्या कार्लायलयाच्या पाडकामावरुन राजकारण पेटलं होतं. विशेष म्हणजे अनिल परब आज म्हाडाच्या कार्यालयात गेले. त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास चर्चा केली. त्यानंतर आपला या अनधिकृत बांधकामाशी काहीच संबंध नाही, असा म्हाडाकडून लेखी स्वरुपात पुरावा आणल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या प्रतिक्रियेवर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या यांनी थेट काढता पाय घेतला.

अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोलणं टाळलेलं आहे. विशेष म्हणजे पत्रकारांनी अनिल परब यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या यांनी अक्षरश: काढता पाय घेतला. हा सगळा प्रकार अचूकपणे कॅमेऱ्यात कैद झालाय.

अनिल परब यांचा किरीट सोमय्या यांच्यावर नेमका आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी आपली बदनामी केली. तसेच आपल्याला नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे. यासाठी आपण मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ

‘सोमय्या आरोप करत असलेली जागा सोसायटीची’

“गेले दीड वर्ष किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते आणि सांगत होते की, हे अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे. मी त्याबाबतीत वारंवार सांगत होतो की, ही जागा माझी नाही. ही जागा सोसायटीची आहे. सोसायटीचं ते कार्यालय आहे. ते कार्यालय वापरण्याची परवानगी मला सोसायटीने दिलेली आहे”, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

‘अनधिकृत बांधकामाशी माझा संबंध नाही’

“माझं हे अनधिकृत कार्यालय आहे, असं किरीट सोमय्या आरोप करत होते. पण हा आरोप सपशेल खोटा आहे. या संदर्भात म्हाडाने मला लेखी स्वरुपात स्पष्टीकरण दिलेलं आहे. कार्यालयाच्या जागेचा, अनधिकृत बांधकामाशी माझा कोणताही संबंध नाही”, असं अनिल परब म्हणाले.

“म्हाडाने पहिल्या पॅरेग्रामध्ये ठळक अक्षरांत लिहिलं आहे की, गांधीनगर वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक ५७-५८ या दोन इमारतीच्या जागेत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाशी आमदार अनिल परब यांचा संबंध आढळून येत नाही”, असं अनिल परब यांनी वाचून दाखवलं.

“किरीट सोमय्या जे गेले कित्येक वर्ष माझ्यावर खोटे आरोप करत आहेत त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा केलाय. त्याचा लेखी पुरावा आज म्हाडाने दिलाय”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

‘किरीट सोमय्या आज तोंडावर पडले’

“म्हाडा कार्यालयामध्ये २७ जून २०१९ रोजी अनिल परब यांच्या नावे जाहीर केलेली नोटीस आम्ही मागे घेतलेली आहे. या दोन गोष्टींचा अर्थ असा होतो, किरीट सोमय्या केवळ जाणूनबुजून मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. ते आरोप म्हाडाने खोटे ठरवले आहेत. म्हाडाने मला लेखी लिहून दिलं आहे. याचा अर्थ असा आहे की, किरीट सोमय्या खोटे बोलत आहेत. किरीट सोमय्या आज तोंडावर पडले आहेत”, अशी टीका अनिल परब यांनी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.