Sanjay Raut | ‘त्या गेस्ट हाऊसमध्ये संजय राऊतांना रशियन फाइल्स चालतात’, भाजपा आमदाराचा हल्लाबोल

Sanjay Raut | 'ते खासदारच राहणार नाहीत, तर नवीन संसदेचा प्रश्नच येत नाही', अशी टीका भाजपा आमदाराने केली. संजय राऊत यांनी नव्या संसद इमारतीवरुन जोरदार टीका केलीय. त्याला भाजपा आमदाराने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिलं.

Sanjay Raut | 'त्या गेस्ट हाऊसमध्ये संजय राऊतांना रशियन फाइल्स चालतात', भाजपा आमदाराचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 1:51 PM

मुंबई : संसदेच्या नवीन इमारतीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलीय. “नव्या संसदेत गेल्यावर मल्टीप्लेक्समध्ये आल्यासारखं वाटतं. मल्टीप्लेक्समध्ये जशा 4-5 स्क्रीन लावलेल्या असतात, तसं मला नव्या संसदेत वाटतं. मला ते संसद भवन अजिबात वाटत नाही. मी 20 वर्ष दिल्लीच्या संसदेत जातोय, मी ऐका ऐतिहासिक इमारतीत प्रवेश करतोय, माझ्यासोबत देशाचा इतिहास चालतोय, असं वाटायच. पण ती भावना नवीन संसदेत प्रवेश करताना येत नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुनी मातोश्री सोडून नवीन मातोश्री का बांधली? असा सवाल केला.

“संजय राऊत खासदारच राहणार नाहीत, त्यांच्यासाठी मग नवीन संसदेचा प्रश्न येतोच कुठे?” असं नितेश राणे म्हणाले. “ज्यांच्याविरोधात राज्यसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सुरु आहे. ते दुसऱ्यांच्या भाषेबद्दल बोलतात. संजय राऊत यांना आरएच्या गेस्ट हाऊसमध्ये, न्यूझीलंड हाऊसमध्ये ज्या सोयी-सुविधा, एअर कंडिशन मिळतं, तिथे त्यांना गुदमरायला होत नाही. तिथे रशियन फाइल्स चालतात. तस त्यांना नवीन संसदेत वाटणार नाही” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. पंतप्रधान पद टिकावं म्हणूनच ज्योतिषाच्या सल्लानुसार हे संसद भवन उभारल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. याच आठवड्यात नवीन संसदेत प्रवेश

ठाकरे गट आणि भाजपामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. भाजपाकडून आमदार नितेश राणे ठाकरे गटाच्या प्रत्येक टीकेला त्याच पद्धतीच प्रत्युत्तर देतात. आज पुन्हा एकदा नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. याच आठवड्यात भारतीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश केला. गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीत हा प्रवेश झाला. त्यासाठी संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. नव्या संसद भवनातील पहिल्याच अधिवेशनात ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.