AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान

ईडी कधी सूडाने कारवाई करत नाही. ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील त्यामुळेच त्यांनी नोटीस बजावली असेल, असं सूचक विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काढलं. (bjp leader Pravin Darekar reaction on ED notice to anil parab)

काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 7:28 PM

मुंबई: ईडी कधी सूडाने कारवाई करत नाही. ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील त्यामुळेच त्यांनी नोटीस बजावली असेल, असं सूचक विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काढलं. (bjp leader Pravin Darekar reaction on ED notice to anil parab)

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे, त्यावर प्रवीण दरेकर बोलत होते. ईडी किंवा तपास यंत्रणांना सूडाने कारवाई करता येत नाही. आपल्या देशाचं संविधान आणि कायदा मजबूत आहे. प्रत्येक नागरिकांचा हक्क सुरक्षित केला आहे. ईडीमध्ये काही पुरावे असतील, काही तक्रार असेल किंवा काही इनपुट्स मिळाले असतील तरच ईडी कारवाई करते. जन आशीर्वाद यात्रेत तुम्ही सूडाने वागला म्हणून आम्ही सूडाने वागलो असं मानायचं कारण नाही. ईडी कुणाच्या सांगण्यावरून तपास करत नाही. काही धागेदोरे असतील म्हणूनच नोटीस बजावली असेल, असं दरेकर म्हणाले.

वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे. काल रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना काल अटक झाली. त्या जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत. जन आशीर्वाद यात्रा संपली आणि ताबडतोब या पालकमंत्र्यांना वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं. ईडीचं. येऊ द्या. कायदेशीर लढाई आहे. आम्ही काय कुणाला धमक्या देणार नाही. आम्ही नॉर्मल माणसं आहोत. नॉर्मल माणसं असल्याने नॉर्मल माणसं कायदेशीर लढाया लढतात आणि जे असत्य आहे, जे बनावट आहे. त्याचा पर्दाफाश करतात. आमच्या लढाईला नैतिकतेचं बळ आहे. आम्ही बनावट नाही. तुम्ही हे सर्व आमच्यावर लादत आहात, असं राऊत म्हणाले.

आम्ही डगमगणार नाही

तुम्ही असे कितीही कागद पाठवा काही हरकत नाही. तुम्ही करत राहा आणि लढत राहू. महाराष्ट्र आणि शिवसेनेची लढण्याची परंपरा आहे. लढण्याची. अशा कितीही नोटीसा पाठवल्या चिखलफेक केली, खोटेनाटे आरोप केले तरी आम्ही डगमगणार नाही, हे लिहून घ्या, असं सांगतानाच माझी 100 लोकांची यादी येणार आहे. कालच म्हणालो लढाई कायदेशीर होईल. कागद हे त्यांचं शस्त्रं असेल तर कागदाच्या सूरनळ्या हे आमचं अस्त्रं आहे, असा हल्लाही राऊत यांनी केला.

सूडाचं राजकारण करता येत नाही

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीला कायद्याने अधिकार दिला आहे. त्यांच्याकडे काही तक्रार असेल. सचिन वाझे प्रकरणात काही माहिती असेल त्यामुळे ईडी चौकशी करत असावी. ईडी जर चौकशी करणार असेल आणि आपला काही दोष नसेल तर या देशात कुणाचंही सरकार असलं तरी सूडाचं राजकारण करता येत नाही हे आपण परवा पाहिलं आहे. परवा नारायण राणेंना अटक करण्याचा प्रयत्न केला. लगेच जामीन मिळाला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दोषी असो किंवा नसो राजकीय पक्षाचं विमा कवच घेण्याचं कारण नाही. राजकीय पक्ष म्हणजे काही सेक्युरीटी नाही. तुम्ही नेता आहात म्हणून तुम्ही काहीही कराल असा कायदा यांच्यासाठी दुर्देवाने देशाने केला नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

पळपुटेपणा करू नका

नितेश राणेंनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हतं ना… नोटीसच मिळणार होती… आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, असं राणे यांनी म्हटलं आहे. (bjp leader Pravin Darekar reaction on ED notice to anil parab)

संबंधित बातम्या:

हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, नितेश राणे यांचं अनिल परब यांना आव्हान

Anil Parab ED Notice | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआड चर्चा; नारायण राणें पहिल्यांदाच म्हणाले…

(bjp leader Pravin Darekar reaction on ED notice to anil parab)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.