मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल; आमदार अतुल भातखळकरांनी व्यक्त केला विश्वास

या बैठकीला आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा मतदार संघ निहाय नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल; आमदार अतुल भातखळकरांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल; आमदार अतुल भातखळकरांनी व्यक्त केला विश्वास
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 6:25 PM

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. बुधवारी मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत रणनीती ठरवण्यासोबतच प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. नितेश राणे यांच्यावरही महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे, त्या मुंबई महापालिकेच्या 288 प्रभागात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असावी? कोणत्या नेत्यांवर काय जबाबदारी? या संदर्भातील प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल हा आत्मविश्वास आपल्याला असल्याचे भातखळखर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. BJP MLA Atul Bhatkhalkar expressed confidence about Mumbai municipal corporation election)

या बैठकीला आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा मतदार संघ निहाय नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील मुद्दे, संघटना मजबूत करणे या विषयावर चर्चा झाली. नितेश राणेंवर दक्षिण-मध्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली असून मराठी आणि मुंबईतील कोकणी मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे.

आमदार नितेश राणे अॅक्शन मोडमध्ये

दरम्यान, नारायण राणे केंद्रात मंत्री बनल्यानंतर आमदार नितेश राणे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. कोर कमिटीच्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाच्या 6 जागांसाठी भाजप वेगळी रणनिती आखणार असल्याची माहिती मिळतेय. भाजपसाठी या 6 जागा प्रतिष्ठेच्या असणार आहे. या 6 जागांवरही भाजप दमदार उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नितेश राणेंचे ट्विटरवरुन मविआला आव्हान

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या कोर कमिटीमध्ये नितेश राणेंना स्थान दिल्याबद्दल नितेश राणेंनी ट्विट केले आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेवर महापौर आणि उपमहापौर सुद्धा भाजपचाच असेल, असं थेट आव्हान सत्ताधारी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ट्विटमधूम दिले आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजप गेल्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढली होती. आता सुद्धा भाजप विरुद्ध महाविकास आघडी असं चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेला तगडे आव्हान देण्यासाठी नितेश राणेंना कोर कमिटीमध्ये सामील करण्यासोबतच महत्वाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या रणांगणाचे योद्धे आता सज्ज होत आहेत एवढे नक्की. BJP MLA Atul Bhatkhalkar expressed confidence about Mumbai municipal corporation election)

‘या’ नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा

कोरोना सरला, आता डेंग्यूचं नवं संकट, आठवड्यात एक कोरडा दिवस पाळण्याचे नागपूरकरांना आवाहन

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.