Rajya Sabha Election 2022: एक एक मत कोट्यवधीच्या मोलाचं, पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक ॲम्बुलन्समधून थेट विधान भवनात, नेमकं काय झालंय?

Rajya Sabha Election 2022: मुक्ता टिळक या पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघातली आमदार आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वीच विशेष ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं होतं.

Rajya Sabha Election 2022: एक एक मत कोट्यवधीच्या मोलाचं, पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक ॲम्बुलन्समधून थेट विधान भवनात, नेमकं काय झालंय?
पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक ॲम्बुलन्समधून थेट विधान भवनात, नेमकं काय झालंय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:36 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) एकाएका मताला महत्त्व आलं आहे. या निवडणुकीत एका मतामुळे कुणाला तरी राज्यसभेत जावं लागणार आहे. तर कुणाला तरी घरी बसावं लागणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अपक्ष फुटू नये म्हणून त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत आहेत. छोट्या राजकीय पक्षांनाही आपल्याकडे वळते करण्यात आलं आहे. याशिवाय जे उमेदवार आजारी आहेत, त्यांना खास व्यवस्था करून मुंबईत आणण्यात आलं आहे. भाजपच्या (bjp) पुण्यातील आमदार मुक्ता टिळक (mukta tilak) यांनाही खास ॲम्बुलन्समधून मुंबईत आणण्यात आलं. स्ट्रेचरवरूनच त्या विधानभवनात पोहोचल्या आणि त्यांनी मतदान केलं. आमदार लक्ष्मण जगताप यांनाही ॲम्बुलन्समधून आणण्यात आलं होतं. त्यांनीही आपल्या मतांचा हक्क बजावला आहे.

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघातली आमदार आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वीच विशेष ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं. आज सकाळी त्यांना रुग्णालयातून थेट विधानभवनात ॲम्बुलन्सने आणण्यात आलं. त्यांना विधान भवनात आणण्याची जबाबदारी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर स्ट्रेचरवरून मुक्ता टिळक यांना विधान भवनात नेण्यात आलं. मतदान केंद्रापर्यंत महाजन त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुक्ता टिळक यांनी आपल्या मतांचा हक्क बजावला. मतदानानंतर टिळक यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्या आजच पुण्याला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येतं.

हे सुद्धा वाचा

कर्करोगाशी झुंज

मुक्ता टिळक या गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना कर्करोग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर आजारी असल्या तरी राज्यसभेसाठी एक एक मत महत्त्वाचं असल्याने पक्षादेश पाळून त्या मुंबईत मतदानासाठी आल्या आहेत. मुक्ता टिळक या पुण्याच्या माजी महापौर आहेत. त्या गेल्यावेळी कसबापेठेतून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

150 आमदारांचे मतदान

आज सकाळी 9 वाजता राज्यसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 12.25 वाजेपर्यंत 238 आमदारांनी मतदान केले आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत हे मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अवघ्या तासा दोन तासातच राज्यसभेचं सर्व चित्रं स्पष्ट होणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.