प्रवीण दरेकर यांनी कळीचाच मुद्दा उपस्थित केला, उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट एकच प्रश्न विचारला..

इतकी वर्षे त्यांनी पक्षाला दिली, खसत्या खाल्या आणि पक्ष सोडून गेल्यावर मात्र त्यांच्यावर तु्म्ही गद्दारीचा शिक्का मारता अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली.

प्रवीण दरेकर यांनी कळीचाच मुद्दा उपस्थित केला, उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट एकच प्रश्न विचारला..
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 10:02 PM

मुंबईः भाजपचे आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासह गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर असलेल्या सत्तेबाबत अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. यावेळी बोलताना त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वावरच घणाघात घातला. गेल्या कित्येक वर्षापासून शिवेसेनेचीच सत्ता महानगरपालिकेवर आहेत. त्यामुळे त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, इतकी वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती.

मग त्यांनी इतक्या वर्षात काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमदार प्रवीण दरेक यांनी बोलताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असला तरी त्यांनी यावेळी बोलताना मुंबईकरांना अनेक प्रकारची अश्वासनं दिली आहेत.

यावेळी ते म्हणाले की, आम्ही मुंबईकरांच्या मोफत पाण्याचा प्रश्न आम्ही लवकरच मार्गी लावू त्याच बरोबर कोळंबक यांच्या पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी अश्वासन दिले.

मुंबई महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकर यांनी इतकी वर्षे सत्ता असूनही त्यांनी काय केले असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही असंही त्यांनी त्यांना सुनावले आहे.

मुंबई बँकेच्या माध्यमातून आणि घरांचे विशेष दर कमी करुन पोलिसांना घर देण्यासाठी आम्ही आमच्या मुंबई बँकेतून कर्ज देणा असल्याचे अश्वासनही त्यांनी दिले आहे.

केंद्रीय रेल्वे खाते आपल्या पक्षाकडेच असल्याने केंद्रीय रेल्वे खात आणि मुंबई महानगरपालिका एकत्रितपणे रेल्वे पटरी बाजूला असलेल्या झोपड्यांचा देखील विचार करू आणि तोही प्रश्न आम्ही लवकरच प्रश्न मार्गी लावू असे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

ज्यावेळी प्रवीण दरेकर बोलत होते, त्यावेळी माईक बंद पडत होता, त्यामुळे त्याची जोरदार चर्चा झाली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी काय केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इतकी वर्षे त्यांनी पक्षाला दिली, खसत्या खाल्या आणि पक्ष सोडून गेल्यावर मात्र त्यांच्यावर तु्म्ही गद्दारीचा शिक्का मारता अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली.

आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदावरुनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर मुलाला तुम्ही मंत्री केला, त्याची काय गरज होती असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.