मोठी बातमी! ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा’, उदयनराजे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलंय.

मोठी बातमी! 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा', उदयनराजे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार
उदयनराजे भोसले Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 9:18 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केलीय. उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीदेखील पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय. याप्रकरणी नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा’, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीय. तसेच “महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे”, असा खेद त्यांनी व्यक्त केलाय.

उदयनराजे भोसले पत्रात नेमकं काय म्हणाले आहेत?

“काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्देवी आहे. याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे”, असं उदयनराजे आपल्या पत्रात पंतप्रधानांना उद्देशून म्हणतात.

“२० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे. आणि दुसरे वक्तव्य हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो”, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केलाच आहे. पण यापूर्वीही त्यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केले होते. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे”, अशी तक्रार उदयनराजे यांनी केलीय.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. हे सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांना जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वत: बदलायला तयार नाहीत”, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत”, असं मत त्यांनी मांडलं.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने राज्यपाल पदावरुन दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यावर योग्य ती कारवाई कराल याची खात्री आहे”, असं उदयनराजे पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.