AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking : आव्हाड, यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपचा आक्षेप, जयंत पाटलांच्या हाती मतपत्रिका दिल्यानं वाद, नेमकं काय घडलं?

Big Breaking : भाजपचे आमदार पराग अळवणी आणि आमदार अतुल सावे यांनी या तिन्ही मतांवर आक्षेप घेतला आहे. पराग अळवणी यांनी मीडियाशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. मी पीयुष गोयल यांचा एजंट आहे.

Big Breaking : आव्हाड, यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपचा आक्षेप, जयंत पाटलांच्या हाती मतपत्रिका दिल्यानं वाद, नेमकं काय घडलं?
आव्हाड, यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपचा आक्षेपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:26 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad), आमदार सुहास कांदे (suhas kande) आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. आव्हाड यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली. यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका आपल्या एजंटला दाखवली. त्यामुळे ही तिन्ही मते बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने ही मागणी फेटाळली आहे. हे मत बाद होत नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्याने सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करू, असा इशारा भाजपने दिला आहे. तर, आम्हाला मतदान कसं करायचं हे आम्हाला कळतं. तुम्हालाच कळतं असं नाही. भाजपचे नेते बावचळलेले आहेत, अशी टीका करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

भाजपचे आमदार पराग अळवणी आणि आमदार अतुल सावे यांनी या तिन्ही मतांवर आक्षेप घेतला आहे. पराग अळवणी यांनी मीडियाशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. मी पीयुष गोयल यांचा एजंट आहे. तर अतुल सावे हे अनिल बोंडे यांचे एजंट आहेत. मी सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानाला आक्षेप घेतला आहे. तर सावे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानाला आक्षेप घेतला आहे, अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

नियमभंग केला

राज्यसभा निडवणुकीच्या प्रक्रियेत प्रत्येक पक्षाच्या मतदाराने त्यांच्या पक्षाच्या एजंटला एका ठरावीक अंतरावरून मतपत्रिका दाखवायची असते. त्यासाठी आतमध्ये व्यवस्थाही करण्यात आली आहे. यशोमती ठाकूर आणि आव्हाड यांनी त्यांच्या एजंटच्या (जयंत पाटील) हातात मतपत्रिका दिली. मतपत्रिका दाखवण्याऐवजी ती एजंटच्या हातात देणं योग्य नाही. त्यामुळे मी त्याला आक्षेप घेतला आहे. याबाबतचं तक्रार पत्रंही मी रिटर्निंग ऑफिसरला दिलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तिन्ही मते बाद करा

आपल्या स्वत:च्या पक्षाच्या एजंटला केवळ मतपत्रिका दाखवायची असते. पण कांदे यांनी दोन वेगवेगळ्या पक्षाच्या एजंटला दिसेल अशा अंतरावरून मतपत्रिका दाखवली. तिथे अंतराची व्यवस्था आहे. पण तरीही कांदे यांनी नियम भंग केला. या तिन्ही कृत्यामुळे मत बाद होतं हा आमचा दावा आहे. तिथे व्हिडीओ शुटिंग झालं आहे. त्यामुळे मी तक्रारीची दोन पत्रं दिली आहेत. कांदे आणि ठाकूर यांचं मतदान बाद करण्यासाठी हे पत्रं दिलं आहे. सावेंनी यांनी आव्हाडांची तक्रार करणारं पत्रं दिलं आहे. व्हिडिओ शुटिंग पाहा. नियमाचं भंग झाला हे लक्षात येतं. तीन मते बाद करावी मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वच स्तरावर दाद मागू

अद्यापही रिटर्निंग ऑफिसरने माझ्याशी चर्चा केली नाही. आमचा आक्षेप काय आहे. व्हिडिओ शुटिंगमध्ये काय आहे हे पाहिल्याशिवाय काही निर्णय होऊ शकत नाही. अशा प्रकारचा काही दबाव रिटर्निंग ऑफिसरवर येत असेल तर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही दाद मागू. हिअरिंग न घेता अशा गोष्टी येत असेल तर ही गंभीर बाब असेल, असं ते म्हणाले. आता आम्ही रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार केली आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही या प्रकारची दाद सर्वच स्तरावर मागू, असंही त्यांनी सांगितलं.

नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी.