नकली ओळखपत्राद्वारे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, 5 दलाल अटकेत, सव्वा लाखांची तिकिटे जप्त
तिकिटांच्या दुप्पट किंवा तिप्पट पैसे वसूल करतात, अशी माहिती लोकमान्य टिळक टर्मिनसच्या RPF ला मिळाली होती.
मुंबई : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करत प्रवाशांचे नकली ओळखपत्र बनवून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जातात. अशाप्रकारे तिकिटांच्या विक्री करणाऱ्या 5 दलालांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथील रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 70 तिकिटे जप्त करण्यात आली आहे. याची किंमत सव्वा लाख रुपये आहे. (Five Railway Tickets Brokers Arrest)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून फक्त आरक्षण असलेल्या प्रवाशांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. याचा फायदा काही तिकीट दलाल घेत आहे. ज्या प्रवाशांना गावी जायचे असेल, त्यांच्या नावाने IRCTC या रेल्वेच्या वेबसाईटवर बनावट ओळखपत्र तयार करत. त्यानंतर हे तिकिटांच्या दुप्पट किंवा तिप्पट पैसे वसूल करतात, अशी माहिती लोकमान्य टिळक टर्मिनसच्या RPF ला मिळाली होती.
यानंतर पोलिसांनी रे रोड या ठिकाणी त्यांनी सापळा रच 5 जणांना अटक केली. राजमल गहरी लाल जैन (31), बाबूल मियाँ आफीउद्दीन अहमद (39) शहीद वाहिद पठान (33) रिजवान मो उस्मान (32) संतोष गणेश गुप्ता (30) अशी या आरोपींची नाव आहेत.
या आरोपींनी 80 बनावट आय डी तयार केले होते. सध्या ते ब्लॉक करण्यात आले आहेत. या आरोपींना याआधीसुद्धा तिकिटांचा काळाबाजार करताना अटक केली आहे. दरम्यान यात आणखी किती दलालांचा समावेश आहे, याची चौकशी रेल्वे सुरक्षा बल करत आहेत. (Five Railway Tickets Brokers Arrest)
पतीची घरफोडी, बायकोकडून दागिन्यांची विक्री, कल्याण पोलिसांकडून गुन्ह्याची उकलhttps://t.co/C3UF3tq45s #Kalyan #Police
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2021
संबंधित बातम्या :
पतीची घरफोडी, बायकोकडून दागिन्यांची विक्री, कल्याण पोलिसांकडून गुन्ह्याची उकल
TRP Scam मधील आरोपी BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता जे जे रुग्णालयात दाखल