AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत बेडसाठी पैसे देण्याची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका, बीएमसीचं आवाहन

बेडची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश आयुक्त इकबाल चहल यांनी दिले.

मुंबईत बेडसाठी पैसे देण्याची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका, बीएमसीचं आवाहन
वादग्रस्त व्हिडीओबाबत मुंबई महापालिकेचा आक्रमक पवित्रा
| Updated on: May 13, 2021 | 1:56 AM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड आरक्षित बेडची अनधिकृतपणे विक्री होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाल्या. यानंतर एकच खळबळ उडाली. याची गंभीर दखल घेत आता महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली. त्यांनी संबंधित सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना महापालिकेच्या रुग्णालयांमधील बेड वितरणाबाबत अत्यंत काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी दररोज सकाळी रुग्णशय्या विषयक आढावा घेण्याचेही निर्देश आयुक्त महोदयांनी दिले आहेत. त्याचबरोबर अशाप्रकारे बेडची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले (BMC Commissioner order to file case against those who are black marketing of beds in Mumbai).

बीएमसीने नागरिकांना नम्र विनंती केलीय की, “बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. त्यांचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियंत्रण कक्षांद्वारे केले जात आहे. या विषयीची सर्व माहिती संबंधित संगणकीय प्रणालीच्या डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. ही नियमितपणे अद्ययावत होत असते. तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच बेडची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना किंवा महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला द्यावी.”

मुंबईत सध्या 10 हजार 829 रुग्णशय्या (बेड) उपलब्ध

“बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सध्या एकूण 22 हजार 564 रुग्णशय्या आहेत. यापैकी 10 हजार 829 रुग्णशय्या सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील 80 टक्के रुग्णशय्या या कोविड बाधित रुग्णांसाठी राखीव आहेत,” असंही बीएमसीने नमूद केलंय.

‘कोविड बाधित रुग्णांना बेडचं वितरण 24 विभागीय वॉर्ड वॉररुममधून’

कोविड बाधित रुग्णांसाठी उपलब्ध रुग्णशय्यांचे वितरण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागस्तरीय वॉर्ड वॉररूमद्वारे करण्यात येते. तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्यांना रुग्णालयांमध्ये रुग्णशय्येची आवश्यकता आहे त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा आणि नियंत्रण कक्षाद्वारेच बेड वितरण करवून घ्यावे, ही विनंती. महापालिकेच्या सर्व विभागस्तरीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक हे महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि ट्विटर सारख्या समाज माध्यमातून यापूर्वीच प्रसारित करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

SRPF जवानांना मोठा दिलासा, बदलीसाठी 15 वर्षाची अट रद्द, आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश

लसीकरण मोहीम आणि मुख्यमंत्र्यांच्या संवाद शैलीवर भातखळकरांची खोचक टीका

व्हिडीओ पाहा :

BMC Commissioner order to file case against those who are black marketing of beds in Mumbai

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.