AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Covid Center Scam : IAS ऑफिसर Sanjeev Jaiswal यांच्याकडे 100 कोटीची मालमत्ता? ED चा दणका

BMC Covid Center Scam : इतकी मालमत्ता कुठून आली? मढमध्ये भूखंड, फ्लॅटस कधी विकत घेतले? ED च्या छाप्यात BMC च्या माजी ऑफिसरकडे घबाड सापडल्याने सर्वांचे डोळे विस्फारलेत. सुजीत पाटकर यांच्या LHMS कॉन्ट्रॅक्ट देण्यात काय रोल?

BMC Covid Center Scam : IAS ऑफिसर Sanjeev Jaiswal यांच्याकडे 100 कोटीची मालमत्ता? ED चा दणका
ED Raid on IAS officer Sanjeev JaiswalImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 2:00 PM

मुंबई : कोविड फिल्ड हॉस्पिटल आर्थिक अनियमितता प्रकरणांची सक्तवसुली संचलनालय म्हणजे ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणात बुधवारी IAS अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या घरावर छापेमारीची कारवाई करण्यात आली. ED ला त्यांच्या छापेमारीच्या कारवाईत संजीव जैस्वाल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळून आली आहे. संजीव जैस्वाल आणि त्यांच्या पत्नीकडे 24 प्रॉपर्टी असल्याच समोर आलय. मढ येथे अर्ध्या एकरचा प्लॉट आणि अनेक फ्लॅटस आहे.

संजीव जैस्वाल यांच्याकडील एकूण मालमत्तेची किंमत 34 कोटीच्या घरात असून फिक्स डिपॉझिटमध्ये 15 कोटी रुपये आहेत. संजीव जैस्वाल यांना या सर्व मालमत्तांचा ED ला हिशोब द्यावा लागेल. तो, देता आला नाही, तर पुढच्या काही दिवसात त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

जैस्वाल यांनी या मालमत्तेवर काय उत्तर दिलं?

मालमत्तांची एकूण किंमत 34 कोटींच्या घरात असल्याच जैस्वाल यांच्याकडून सांगण्यात आल्याच ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितलं. भूखंड आणि एफडी पत्नीला तिचे आई-वडिल, आजी-आजोबांकडून मिळाल्याच जैस्वाल यांनी सांगितलं.

मालमत्तेचा आकडा किती कोटीपर्यंत जाऊ शकतो?

संजीव जैस्वाल यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल होतं. पण गुरुवारी ते हजर झाले नाहीत. कोविड हॉस्पिटल कॉन्ट्रॅक्टमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याच्या प्रकरणात ईडीकडून ही धाडसत्र आणि चौकशी सुरु आहे. ईडीला कॉन्ट्रॅक्ट संदर्भात संजीव जैस्वाल यांची चौकशी करायची आहे. त्यांची मालमत्ता 100 कोटीपेक्षा जास्त असू शकते, असा संशय आहे. हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, त्यावेळी संजीव जैस्वाल मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. आता ते म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत.

कधी विकत घेतली प्रॉपर्टी?

बुधवारी ईडीची धाड पडली, त्यावेळी संजीव जैस्वाल त्यांच्या घरातच होते. रात्री उशिरापर्यंत ईडीची कारवाई सुरु होती. तपासा दरम्यान संजीव जैस्वाल यांनी स्वत:हून संपत्तीची कागदपत्र अधिकाऱ्यांकेड सुपूर्द केली. इन्कम टॅक्स रिर्टन्समध्ये आपण आणि पत्नीने सर्व संपत्तीची नोंद ठेवल्याचा दावा त्यांनी केला. 1980 ते 1990 च्या दशकात बहुतांश प्रॉपर्टी विकत घेण्यात आल्याच त्यांनी सांगितलं. कॉन्ट्रॅक्टच्या आरोपांवर काय उत्तर दिलं?

कोविड-19 संदर्भात खरेदी आपल्या अधिकार क्षेत्रात नव्हती, असं त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. सुजीत पाटकर यांच्या LHMS कॉन्ट्रॅक्ट देण्यात आपली मर्यादीत भूमिका असल्याच त्यांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.