कोरोनाला थोपवण्यासाठी मुंबईचे ‘मिशन लसीकरण’, रविवारीसुद्धा लोकांना लस मिळणार
मुंबईमध्ये यानंतर रविवारीसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. मिशन लसीकरण अंतर्गत मनपाने हा निर्णय घेतला आहे. (bmc corona vaccination drive)
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहा:कार उडाला आहे. रोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राजधानी मुंबईमध्ये तर अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर आगामी काळात मुंबईसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्वांचा धोका लक्षात घेता आता मुंबई मनपाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये यानंतर रविवारीसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. मिशन लसीकरण अंतर्गत मनपाने हा निर्णय घेतला आहे. (BMC decided Corona vaccination drive will be continue on Sunday also)
लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवणार
राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आहे. यामध्ये ज्या नागरिकांचे वय हे 45 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येईल. मुंबईत लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लस द्यायची असेल तर लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाचा धोका पुन्हा वाढला असून संसर्गाला थोपवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लस मिळणे जरजेचे आहे.
खासगी, सरकारी लसीकरण केंद्रांवर लस मिळणार
या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मिशन लसीकरणांतर्गत मुंबई महापालिकेकडून आठवड्याचे सातही दिवस लसीकरणाची मोहीम सुरु राहणार आहे. लसीकरण हा कोरोनाला थोपवण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय असल्यामुळे मनपाने हा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मनपाचा मानस आहे. सध्या मुंबईच्या सर्व सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची मोहीम सुरु आहे.
राज्यात 24 तासांत 49 हजार नवे रुग्ण
दरम्यान, दरम्यान राज्यात 3 एप्रिल रोजी एका दिवसात कोरोनाचे तब्बल 49447 नवे रुग्ण आढळले. तसेच तीन एप्रिलला दिवसभरात तब्बल 277 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून 3 एप्रिलला दिवसभरात प्रथमच कोरोना रुग्ण 50 हजाराच्या जवळपास गेले. या आकडेवारीमुळे राज्य सरकार तसेच आरोग्य विभाची डोकेदुखी वाढली असून लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचार केला जात आहे.
इतर बातम्या :
प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर जसे अत्याचार केले अगदी तसंच घडतंय; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनचा इशारा, ‘स्टॉक’ जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ; वाईन शॉपबाहेर रांगा
(BMC decided Corona vaccination drive will be continue on Sunday also)