Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबई पालिका मेहरबान, प्रतीक्षा बंगल्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ, लोकायुक्तांनी फटकारलं
अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्याचे कंपाऊंड पाडले जाणार आहे. 2017 पासून ही कारवाई केली जात आहे. मात्र अद्याप हा मुद्दा प्रलंबितच आहे. याबाबतची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुक्तांकडे केलेली आहे. या तक्रारीवरील सुनावणीदरम्यान, लोकायुक्तांनी वरील निरीक्षण नोंदवले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्यावर कारवाई करण्यास मुंबई पालिका टाळाटाळ करत असल्याचे निरीक्षण लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी नोंदवले आहे. जुहू येथील रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्याचे कंपाऊंड पाडले जाणार आहे. 2017 पासून ही कारवाई केली जात आहे. मात्र अद्याप हा मुद्दा प्रलंबितच आहे. याबाबतची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुक्तांकडे केलेली आहे. या तक्रारीवरील सुनावणीदरम्यान, लोकायुक्तांनी वरील निरीक्षण नोंदवले. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
लोकांयुक्त नेमकं काय म्हणाले ?
अमिताभ बच्चन यांच्या घराच्या कंपाऊंडवर कारवाई केली जात नाहीये. त्यासाठी बीएमसीने दिलेले कारण मला योग्य वाटत नाही. जेव्हा रस्ते रुंदीकरण सुरु होईल; तेव्हा त्यासाठी तरतूद करण्यात येईल. पालिकेकडून या कामासाठी मुद्दाम उशीर केला जात आहे. पावसाळा असल्यामुळे 30 मे नंतर कोणतेही पाडकाम केले जाणार नाही, हे सर्वश्रूत आहे. म्हणजेच पुढच्या आणखी एका वर्षासाठी जमीन अधिग्रहण लांबवले जाणार आहे. हे चूक आहे,” असं लोकायुक्त यांनी म्हटलंय.
अमिताभ बच्चन यांच्यावर मेहरबानी का ?
मागील महिन्यात मुंबई महानगरपालिकेने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर कारवाई का केली नाही, याबाबतचे स्पष्टीकरण लोकायुक्तांना दिले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून अद्याप जमिनीचे अधिकग्रहण करण्यात आले नसल्याचे बीएमसीने सांगितले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला असलेल्या इतर बंगल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. रस्ते रुंदीकरणासाठी जेव्हा कंत्राटदार नेमण्यात येईल तेव्हा पुढच्या आर्थिक वर्षात बच्चन यांच्याकडून जमीन घेण्यात येईल, असे बीएमसीने सांगितले आहे. याबाबत काँग्रेसचे नगरसेवक ट्यूलीप मिरांडा यांनी “अमिताभ बच्चन यांच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या बंगल्यांवर कारवाई केली जातेय. मग अमिताभ बच्चन यांच्या घराचे कंपाऊंड का तोडले जात नाही. लोकायुक्तांनी बीएनसीने दिलेले स्पष्टीकरण अमान्य केलेले आहे. तसेच रस्ते विभागाला याबाबात उत्तर देण्यास सांगितले आहे, असे सांगितले.
नेमके प्रकरण काय आहे ?
अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला रस्त्यालगत आहे. रस्ता बांधकाम करताना बंगल्याची भिंत पाडावी लागणार आहे. भींत पाडून 40 फुटांचा रस्ता 60 फुटांचा करण्यात येणार आहे. परंतु, सध्या कंत्राटदार नसल्यानं रस्त्याचं बांधकाम सुरू करण्यात आलं नाही. त्यामुळं सध्यतरी प्रतीक्षावर हातोडा चालणार नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अतिक्रमण केल्यास पालिकेचा हातोडा चालतो. मग, बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर का नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
इतर बातम्या :
Mumbai Lockdown : .. तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल, इकबाल चहल यांनी अट सांगितली