AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट

सध्या ब्रिटनहून भारतात येण्यासाठी निघालेल्या पाच विमानांना मुंबईत उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. | flights arriving from britain

नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट
| Updated on: Dec 21, 2020 | 9:34 PM
Share

मुंबई: ब्रिटनमध्ये नव्या स्वरुपाचा कोरोना विषाणू सापडल्यामुळे जगभरातील सर्व देश सावध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून (Britain Flight) भारतात येणारी विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार असली तरी सध्या ब्रिटनहून भारतात येण्यासाठी निघालेल्या पाच विमानांना मुंबईत उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ( Special rooms for quarantine facility in Mumbai)

यापैकी दोन विमाने आज रात्री, दोन विमाने उद्या सकाळी दहा वाजता तर एक विमान हे रात्री 11 वाजण्यापूर्वी मुंबईत दाखल होईल. या विमानांमध्ये 1000 प्रवाशी आहेत. या सर्वांची विमानतळावर तपासणी केली जाईल. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले जाईल. तर उर्वरित प्रवाशांनाही हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल.

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी 2000 खोल्यांची व्यवस्था

ब्रिटनमधून येणाऱ्या या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी 2000 खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 1000 खोल्या ताज, ट्रायडंट आणि मेरिएट यासारख्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये असतील. तर अन्य 1000 खोल्या या बजेट हॉटेल्समध्ये असतील. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांना विमानतळावरून थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात येईल.

परदेशातून येणाऱ्या लोकांबाबात विशेष काळजी

परदेशातून येणाऱ्या लोकांसोबत काम करणारे सर्व कर्मचारी हे पीपीई किट घालूनच काम करतील. इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यापूर्वी बाहेरच्या देशांमधून आलेल्या प्रवाशांमुळेच भारतात कोरोना पसरला होता. त्यामुळे आम्हाला याची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

‘यंदाचे नववर्ष नॉर्मल नाही, सेलिब्रेशनला मर्यादा’

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू असल्यामुळे रात्री ११ पर्यंत नियमात कोणताही बदल नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध असतील. हे वर्ष नॅार्मल नाही. त्यामुळे 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर नियंत्रण ठेवाव लागेल, असे इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

( Special rooms for quarantine facility in Mumbai)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.