BMC covid19 new guidelines : चौपाट्या ते खाऊ गल्ली, शक्य तिथे सगळीकडे कोरोना टेस्ट, BMC अॅक्शन मोडमध्ये

मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन (BMC action plan for corona vaccination) तयार केला आहे. महापालिकेने त्याबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करत, (BMC covid19 new guidelines ) गर्दीची ठिकाणे टार्गेट केली आहेत.

BMC covid19 new guidelines : चौपाट्या ते खाऊ गल्ली, शक्य तिथे सगळीकडे कोरोना टेस्ट, BMC अॅक्शन मोडमध्ये
bmc
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 6:19 PM

मुंबई : मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन (BMC action plan for corona vaccination) तयार केला आहे. महापालिकेने त्याबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करत, (BMC covid19 new guidelines ) गर्दीची ठिकाणे टार्गेट केली आहेत. इतकंच नाही तर समुद्र किनारी म्हणजेच चौपाट्या, मॉलपासून ते खाऊगल्लीपर्यंत शक्य त्या सर्व ठिकाणांवर कोरोना चाचण्या करण्याचं नियोजन केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मिशन टेस्टिंग करता मुंबई महापालिकेने गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. त्यानुसार दररोज 50 हजार चाचण्या करण्याचं मुंबई महापालिकेचं लक्ष्य आहे. (BMC issued new covid19 guidelines Mumbai municipal corporation action plan for corona vaccination)

कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग (BMC Mission Testing) असेल. कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील मॉल्स, (Mumbai malls ) रेल्वे स्थानकं, बस स्थानकांवर, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा याठिकाणी दररोज सुमारे 50 हजार टेस्ट करण्याचं लक्ष्य असेल.

चाचणीला नकार देणाऱ्यांवर कारवाई

दरम्यान, कोरोना टेस्टला नकार देणाऱ्यांवर यापुढे कारवाईही करण्यात येणार आहे. महापालिकेने कोरोना लाट थोपवण्यासाठी हे नियोजन केलं आहे. मुंबईतील 27 प्रमुख मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

प्रत्येक मॉल मध्ये दिवसाला किमान 400 टेस्ट होणार आहे. यामध्ये पॅलेडियम, फिनीक्स, रुनवाल, इन्फिनिटी , इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येतात. विकेन्डला मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अॅन्टिजेन चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल.

गर्दीची ठिकाणे टार्गेट

प्रत्येक वॉर्डमधील गर्दीच्या ठिकाणी दररोज 1000 टेस्टचे टार्गेट आहे. गर्दीची ठिकाणे- रेस्टरंटस, खाऊ गल्ली , फेरीवाले, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे-चौपाट्या, वेगवेगळी सरकारी कार्यालये अशा ठिकाणांवरही या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत.

मुंबईतील लांब पल्ल्याच्या, बाहेरगावच्या रेल्वे येणारी मुख्य 9 रेल्वे स्थानकं- वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, CSMT, कुर्ला, अंधेरी, बोरिवली इत्यादी या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत.

विशेषत: विदर्भातून, गोवा, गुजरात, केरळ, दिल्ली इथून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असेल.

मुंबईतील मुख्य बस स्थानक- परळ, मुंबई सेंट्रल, बोरिवली, कुर्ला-नेहरु नगर येथे दररोज 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत.

मुंबईत दिवसाला ५० हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे. सध्या 20 ते 23 हजार टेस्ट दिवसाला होत आहेत.

मुंबईतील कालची रुग्णसंख्या

बई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरित्या वाढत आहेत. मुंबईमध्ये काल दिवसभरात 3063 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर काल एकूण 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कालच्या 3063 रुग्णांना मिळून मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 लाख 55 हजार 914 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 11569 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या  

दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन

Pune Corona update| आशियात महाराष्ट्र, तर पाकिस्तानपेक्षा पुण्यात रुग्णवाढ जास्त

Mumbai Corona | मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.