VIDEO | सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले, बजेट सादर करताना गंभीर बाब
बजेट सादर करण्यापूर्वी त्यांना पाणी प्यायचे होते, परंतु त्यांनी चुकून सॅनिटायजरची बाटली हाती घेतली आणि तोंडाला लावली. (BMC Ramesh Pawar Sanitizer Water)
मुंबई : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेचे बजेट मांडले जात असतानाच ही घटना घडली. सुदैवाने वेळीच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. रमेश पवार यांची प्रकृती ठीक असून त्यांना तातडीने पाण्याची बाटली पुरवण्यात आली. (BMC Joint Commissioner Ramesh Pawar drunk Sanitizer instead of Water)
पाणी समजून सॅनिटायझर प्यायले
महापालिकेचा शिक्षण बजेट सादर होत होतं, त्यावेळी सहआयुक्त रमेश पोवार हे बजेट वाचण्यासाठी आले. कारण अतिरिक्त आयुक्त सलील गैरहजर होते. त्यामुळे अचानक रमेश पोवार यांना बजेट सादर करण्याची वर्णी लागली. बजेट सादर करण्यापूर्वी त्यांना पाणी प्यायचे होते, परंतु त्यांनी चुकून सॅनिटायजरची बाटली हाती घेतली आणि तोंडाला लावली. आपण सॅनिटायजर प्यायल्याचं त्यांच्या लक्षात ते लगेच बाहेर गेले आणि तोंडातील सॅनिटायजर बाहेर टाकलं. मात्र ही गंभीर बाब सर्वांना लक्षात येताच एकच धावपळ उडाली.
नेमकं काय घडलं?
मुंबई महापालिकेचा आज शिक्षण विभागाचा सुरुवातीला बजेट सादर होत होता यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते पण त्यांची तब्येत बरी नसल्याने सह आयुक्त रमेश पवार हे सभागृहात उपस्थित राहिले शिक्षण समितीचे अध्यक्ष संध्या जोशी सभागृहात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2021-22 चा वार्षिक अंदाजपत्रक शिक्षण समिती अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला.
बजेट वाचण्यासाठी रमेश पवार हे आपल्या खुर्चीवर बसले पण वाचण्याआधी त्यांना पाणी प्यायचे होते समोर एक सॅनिटायझर बॉटल आणि एक पाण्याची बॉटल होती यातील पाण्याची बॉटल वगळता त्यांनी चुकून सॅनिटायझरची बॉटल घेतली आणि ते सॅनिटायझर प्यायले मग पालिका सहआयुक्त रमेश पवार बजेट सुरू करत असताना चुकून सैनीटायझर प्यायले नंतर त्यांची तारांबळ उडाली.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या :
यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं
(BMC Joint Commissioner Ramesh Pawar drunk Sanitizer instead of Water)