कोरोना काळातल्या कष्टाचा सन्मान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन” ने सन्मानित

कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना " वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन " ने आज दि. १९ जून २०२१ रोजी महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात सन्मानित करण्यात आले. Kishori Pednekar

कोरोना काळातल्या कष्टाचा सन्मान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन ने सन्मानित
किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 10:45 PM

मुंबई: कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ” वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन ” ने सन्मानित करण्यात आलं. मुंबई महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात हा कार्यक्रम संपन्न झाला. (BMC Mayor Kishori Pednekar felicitated with Maharashtra World Book of Records London Certificate of Commitment outstanding work during corona)

“वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन” चे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

किशोरी पेडणेकर यांच्या कामाची धडाडी प्रेरणादायी

एक महिला व युवतींचे नेतृत्व करणाऱ्या महिला महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांचा आम्हाला अभिमान असून सर्वच महिला वर्गांसाठी त्या प्रेरणास्त्रोत असल्याचे फराह सुलतान अहमद यांनी सांगितले. कोरोना काळात त्यांच्या कामाची धडाडी व उत्साह हा आम्हाला प्रेरणा देणारा असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच आम्ही सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी चित्रपट निर्माता अली अकबर अली अब्बास उपस्थित होते.

किशोरी पेडणेकर कोण आहेत?

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्या वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत शिकल्या आहेत. किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. कायम विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा आहे.

किशोरी पेडणेकर सलग तीन वेळा नगरसेविका

  1. किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत.
  2. त्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे.
  3. किशोरी पेडणेकर यांचे शिक्षण वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत झाले आहे.
  4. किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
  5. नोव्हेंबर 2019 पासून त्या मुंबईच्या महापौर म्हणून काम करत आहेत.
  6. काही काळासाठी त्यांनी एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या.
  7. पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.
  8. किशोरी पेडणेकर यांना 2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

Kishori Pednekar | कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार : किशोरी पेडणेकर

Video : ‘यू आर दी मोस्ट अॅक्टिव्ह मेयर, तुमच्या पक्षातील लोकही घाबरत असतील’, राज्यपालांकडून पेडणेकरांचं कौतुक

BMC Mayor Kishori Pednekar felicitated with Maharashtra World Book of Records London Certificate of Commitment outstanding work during corona

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.