अवैध ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्यांविरोधात महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये, धाडी टाकण्याचा इशारा

मुंबईमध्ये वारंवार आगीच्या घटना घडतात. त्यात अनेकवेळा (BMC Mayor Kishori Pednekar) अवैध गॅस सिलेंडरच्या साठ्यामुळे आगी लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अवैध ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्यांविरोधात महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये, धाडी टाकण्याचा इशारा
Kishori Pednekar
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 11:13 AM

मुंबई : मुंबईमध्ये वारंवार आगीच्या घटना घडतात. त्यात अनेकवेळा (BMC Mayor Kishori Pednekar) अवैध गॅस सिलेंडरच्या साठ्यामुळे आगी लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यासाठी अवैधपणे गॅस सिलेंडर, ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर माझ्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईत संयुक्त पथकामार्फत लवकरच धाड टाकणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे (BMC Mayor Kishori Pednekar Said Will Raid On Stocks Of Illegal Flammable Substances).

आढाव बैठक

वर्सोवा यारी रोड येथील एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला तसेच, गोवंडी मंडाळा येथे आग लागल्यानंतर संपूर्ण मुंबईत कारवाई करण्यापूर्वी संबंधित यंत्रणांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले होते. त्यानुसार, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी महापौर बोलत होत्या.

या बैठकीला मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई शहरचे अप्पर जिल्हाधिकारी अरुण अभंग, पश्चिम उपनगरचे अप्पर जिल्हाधिकारी उद्धव घुगे, पूर्व उपनगरचे अप्पर जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे, पोलीस उपायुक्त चैतन्य एस, अग्निशमन अधिकारी हेमंत परब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापौर धाडी घालणार

मुंबईमध्ये आग लागल्यानंतर जागा जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या अखत्यारीत आहे, असे सांगून अवैध ठिकाणांवर कारवाई होत नसल्याचे संबंधित यंत्रणांच्या निर्देशनास आणून दिल्याचे महापौरांनी सांगितले. यामुळे अवैध माफिया मुंबईत अवैध सिलेंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा साठा करतात. यामुळे आगीच्या दुर्घटनांना सामोरे जावे लागते.

त्यामुळेच आता जिल्हाधिकारी कार्यालय, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचा संबंधित विभाग तसेच पोलीस यांचे संयुक्त पथक नेमून माझ्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईत अवैध साठा असलेल्या ठिकाणांवर धाड टाकणार असल्याचे महापौर म्हणाल्या. जोपर्यंत अवैध माफियांवर कारवाईचा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असून त्यानंतर संयुक्त पथकाद्वारे वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, आजच्या बैठकीच्या अनुषंगाने “प्रमाणित कार्यपद्धती” लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

BMC Mayor Kishori Pednekar Said Will Raid On Stocks Of Illegal Flammable Substances

संबंधित बातम्या :

मुंबई हायजवळ ‘रोहिणी’ नौकेला भीषण आग, तीन खलाशी बेपत्ता

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.