मोठी बातमी : 5 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BMC च्या नव्या गाईडलाईन्स जारी
मुंबईत नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे (BMC new guidelines on corona).
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढलं आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये इमारतींना सील करण्यापासून अनेक गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता आकडा पाहता या गाईडलाईन्स महत्त्वाच्या आहेत. अन्यथा पु्न्हा गेलेले दिवस पुन्हा अनुभवायची नामुष्की मुंबईकरांवर ओढवेल. त्यामुळे या गाईडलाईन्स काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आलं आहे (BMC new guidelines on corona).
मुंबईत कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स नेमक्या काय?
- कुठल्याही निवासी इमारतीत कोरोनाचे पाच पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येईल (BMC new guidelines on corona).
- विलगीकरणाचे नियम, तसेच लग्न आणि सार्वजनिक कार्यक्रमात नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
- ब्राझील येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात येईल.
- घरी विलगीकरणात राहणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्का लावण्यात येईल.
- मास्क न लावता प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता 300 मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे.
- मास्कचा योग्यरित्या वापर न करणाऱ्या आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता मार्शल्सची संख्या दुपचीने वाढवून 48 हजार एवढी करण्यात येणार आहे.
- विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आणि दंड आकारण्याचेल अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.
- लग्न सोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाईल. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दंडात्मक कारवाई करुन आयोजक आणि संबंधित व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल केले जातील.
Updated guidelines issued by Municipal Commissioner Iqbal Singh Chahal to ensure that we don’t let #COVID19 get the better of Mumbai.#NaToCorona#MissionZero pic.twitter.com/Aq3xAdzdaf
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 18, 2021
राज्यात दिवसभरात 5427 नवे रुग्ण
‘राज्यात आज 5427 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि आज नवीन 2543 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1987804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 40858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5 टक्के झाले आहे”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.