Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांच्या भरतीचा वाद चिघळला, निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप

मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांच्या भरतीचा वाद चिघळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (BMC Security Guard recruitment Controversy)

मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांच्या भरतीचा वाद चिघळला, निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 1:48 PM

मुंबई : मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांच्या भरतीचा वाद चिघळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेतील खासगी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकांसाठी कंत्राट देण्याकरिता राबवलेल्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या आरोपानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याबाबतचे निवदेन प्रशासनाने तयार केले होते. मात्र तरीही हा प्रस्तावर मंजूर न झाल्याने वाद निर्माण झाला आहे. (BMC Security Guard recruitment Controversy BJP alleges scam in tender process)

मुंबई महापालिकेची रुग्णालये व कार्यालये यांच्या सुरक्षेसाठी तीन वर्षांकरिता खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार होते. मात्र यासाठी काढलेल्या कंत्राटाचा प्रस्ताव मागे घेण्याचे पत्र स्थायी समितीकडे मिळालेच नसल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्षांनी केला आहे. तर प्रस्ताव मंजूर झाल्याचे अद्याप आपल्याला कळवले नसल्याचे पालिका प्रशासनाने म्हणणे आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खासगी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकांसाठी कंत्राट देण्याकरीता निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र या राबवलेल्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे.

एकूण तीन हजार खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतचे 222 कोटींचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिले जात आहे, असा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही केला होता. यासाठी दुसऱ्या कंत्राटदाराने 40 कोटी कमी दराची बोली लावली होती. त्यामुळे त्याला काम दिले असते तर पालिकेचे 40 कोटी वाचले असते, असा दावाही मिश्रा यांनी केला होता.(BMC Security Guard recruitment Controversy BJP alleges scam in tender process)

संबंधित बातम्या : 

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन

स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत सहभागी होण्याची मुंबईकरांना संधी; विविध विजेत्यांना मिळून 4 लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.