AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपत्कालीन स्थितीत मदतकार्यासाठी मुंबई मनपाची 2 पथके रायगड, कोल्हापूरच्या दिशेने रवाना

आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी मदतकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2 पथके रायगड आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत.

आपत्कालीन स्थितीत मदतकार्यासाठी मुंबई मनपाची 2 पथके रायगड, कोल्हापूरच्या दिशेने रवाना
BMC teams for emergency relief work
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 4:48 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी मनपा क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदतकार्य करीत असते. याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2 पथके रायगड आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. (BMC Send 2 teams for Raigad-Kolhapur for emergency relief work)

रायगड आणि कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेचा एक चमू रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे करीत आहेत. तर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनि:स्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आणखी एक चमू आज कोल्हापूरकडे रवाना झाला आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमुसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे. महापालिकेची यंत्रणा वापरत असताना यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.

यापूर्वी 2019 मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते.

इतर बातम्या

राज्यात पुराचं संकट, यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

सांगलीतील पूरग्रस्तांपेक्षा लवकरच मदत देण्यात आलीय; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

Worli Lift Crash | वरळी लिफ्ट दुर्घटना, पाच मजुरांच्या मृत्यू प्रकरणी दोघा जणांना अटक

(BMC Send 2 teams for Raigad-Kolhapur for emergency relief work)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.