photo story: मुंबई महापालिकेचं डेंग्यू, मलेरियाविरोधात युद्ध; ड्रोनद्वारे फवारणी सुरू

मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. (BMC used drones to control mosquito breeding in mumbai)

photo story: मुंबई महापालिकेचं डेंग्यू, मलेरियाविरोधात युद्ध; ड्रोनद्वारे फवारणी सुरू
drones
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 2:28 PM

मुंबई: मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत धोबीघाट येथे ड्रोनद्वारे औषधांची फवारणी करण्यात आली आहे. डेंग्यूच्या अळ्या आणि डास मारण्यासाठी ही फवारणी करण्यात आली आहे. (BMC used drones to control mosquito breeding in mumbai)

महालक्ष्मी धोबीघाट येथील घराच्या छतांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जी/ दक्षिण विभागातील सर्व वॉर्डमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. मुंबईकरांचे आरोग्य चांगले रहावे हा आमचा प्रयत्न असून प्रत्येक वार्डला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

drones

drones

कमी पैशात जास्त परिणामकारकता यातून साध्य होत असल्यामुळे मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या निश्चितच कमी होण्यास यामुळे हातभार लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच नागरिकांनी आपल्या घरांमध्ये सुद्धा काळजी घेणे गरजेचे असून घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकुलित यंत्रणांमधील टाक्यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

drones

drones

सीएसआर फंडातून ड्रोन खरेदी करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत साडेसात लाख रुपयापर्यंत आहे. जी /दक्षिण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या मिल्स, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीवरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री अश्या ठिकाणी पावसाळांमध्ये पाणी साचून मलेरिया वाहक डांसाची उत्पत्ति होत असते. सदर ठिकाणी पाहणी करण्याकरीता व अळीनाशक फवारणी करण्याकरीता किटकनियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नसल्यामूळे सदर ठिकाणी डासउत्पत्ति होऊन मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होते.

drones

drones

त्याअनुषंगाने स्थानिक आमदार व पर्यावरण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन खरेदी करून ड्रोनच्या सह्याने जून-2021 पासून उपरोक्त ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. या ड्रोनची टँक क्षमता दहा लिटर व बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. हा  ड्रोन  उडविण्यासाठी थींक केअर कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडवला जात आहे.

drones

drones

तसेच याव्यतिरिक्त कीटकनियंत्रण खात्यांच्या कर्मच्याऱ्यांमार्फत विभागामध्ये एकूण 689 एवढे मलेरियावाहक डास उत्पत्ति स्थाने शोधून नष्ट करण्यात आली आहेत. याचा परिणाम पाहता जी/दक्षिण विभागात गत वर्षी पावसाळा कालावधीमध्ये जून ते ऑगस्ट 2020 म्ध्ये एकूण 900 मलेरिया रुग्ण सापडले होते. यावर्षी याच जून ते ऑगस्ट 2021 कालावधीमध्ये मलेरिया रुग्णांमध्ये घट होऊन एकूण 474 मलेरिया रुग्ण सापडले आहेत. (BMC used drones to control mosquito breeding in mumbai)

drones

drones

संबंधित बातम्या:

मुंबईकर महिलेचा दानयज्ञ, टाटा मेमोरियल रुग्णालयाला 120 कोटींची जमीन दान

मुंबईत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, ICU वॉर्ड फुल्ल, रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ

“मंदिरं उघडण्याची हिंमत मनसेत नाही, त्यांचं आंदोलन भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम”

(BMC used drones to control mosquito breeding in mumbai)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.