पालिकेचे वरातीमागून घोडे, चौकशी अहवाल ठेवण्यासाठी बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंटची खरेदी करणार; स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रस्ताव

पालिका मे.अजंता एंटरप्रायजेस या कंत्राटदाराकडून बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंट उपलब्ध करणार असून त्यासाठी पालिका 2 कोटी 53 लाख रुपये खर्च करणार आहे. (BMC will purchase a closed variable segment to hold the inquiry report)

पालिकेचे वरातीमागून घोडे, चौकशी अहवाल ठेवण्यासाठी बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंटची खरेदी करणार; स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रस्ताव
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 11:55 PM

मुंबई : मुंबई महापालिकेत आतापर्यंत नालेसफाई, रस्ते, शैक्षणिक, भूखंड खरेदी, ग्रीस, रुग्णालयीन उपकरणे खरेदी आदी प्रकरणांत भ्रष्टाचार, घोटाळे झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीच्या फाईली, कागदपत्रे आदी सुरक्षितपणे जतन करणे महत्वाचे आहे. मात्र पालिकेकडे तशी स्वतंत्र्य व्यवस्था नसल्याचे समजते. त्यामुळेच या गंभीर प्रकरणाच्या फाईली रॅक, कपाटे यांची क्षमता पुरेशी नसल्याने पालिका कार्यालयात उघड्यावर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील वातावरणामुळे या फाईली खराब होत आहेत, अशी जाहीर व धक्कादायक कबुली पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता यांनी दिली आहे. (BMC will purchase a closed variable segment to hold the inquiry report)

पालिका बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंटची खरेदी करणार

आतापर्यंत भ्रष्टाचार, घोटाळे, गैरव्यवहार प्रकरणांत चौकशी होऊन तयार केलेले किती अहवाल व कागदपत्रे खराब झाली. याबाबतची माहिती देण्याचे प्रस्तावात टाळण्यात आले आहे. मात्र आता यावर उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाने, गंभीर प्रकरणातील चौकशी अहवाल, कागदपत्रे, फाईल्स व्यवस्थित व योग्य पद्धतीने जतन आणि सुरक्षित ठेवण्यासाठी बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंट उपलब्ध करण्याचा व त्याचा वापर करण्याचा निर्णय उशिराने का होईना मात्र घेतला आहे. त्यामुळे अहवाल, फाईल्स, कागदपत्रे ठेवणे, हाताळणे सोयीस्कर होणार आहे. परिणामी कार्यालयीन कामकाजातही सुसूत्रता येणार असल्याचा प्रशासनाचा आत्मविश्वास आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

या प्रस्तावात मुंबई महापालिकेतील 24 विभाग कार्यालये, रुग्णालये, नगर अभियंता खाते आणि इतर महत्वाच्या कार्यालयात घडत असलेल्या अनियमितता, गैरवर्तवणुकीची आणि गैरव्यवहाराची चौकशी प्रकरणे परिमंडळीय कार्यालयाकडून पूर्ण झाल्यावर त्याबाबतच्या अंतिम कार्यवाहीकरीता सर्वच प्रकारच्या खात्याअंतर्गत चौकशी विभागाकडे वर्ग करण्यात येतात.

पालिका 2 कोटी 53 लाख खर्च करणार

खात्याअंतर्गत चौकशी विभागाकडे असलेला दस्तावेज हा ‘अ’ श्रेणीचा असल्याने त्याचे जतन योग्य रितीने होणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यासाठी, पालिका मे.अजंता एंटरप्रायजेस या कंत्राटदाराकडून बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंट उपलब्ध करणार असून त्यासाठी पालिका 2 कोटी 53 लाख रुपये खर्च करणार आहे. मात्र ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर सहा महिन्यांचा आणखी कालावधी लागणार आहे. मात्र त्या अवधीत या कागदपत्रांच्या सुरक्षिततेचे काय करणार, असा प्रश्न भाजप, विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (BMC will purchase a closed variable segment to hold the inquiry report)

इतर बातम्या

UPSC Recruitment 2021: संघ लोकसेवा आयोगानं प्रिन्सिपलच्या 363 पदांवर काढली भरती, upsc.gov.in वर करा अर्ज

मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची दहशत, तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, परिसरात चोरांचाही सुळसुळाट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.