पालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना

महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डाच्या 10 शाळा सुरु केल्या जाणार आहेत.

पालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 9:50 PM

मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी अद्ययावत सुविधा असणार्‍या सीबीएसई बोर्डाच्या आणखी 10 शाळा मुंबई महापालिका सुरू करणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. (BMC will start 10 CBSE Board schools in Mumbai, Aditya Thackeray’s Concept)

पालिकेच्या या नव्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये ज्युनियर केजी (शिशुवर्ग), सिनीयर केजी (बालवर्ग) आणि पहिली ते सहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंतचे वर्ग वाढवले जाणार आहेत.

90 टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने होणार

पालिकेच्या सीबीएसई शाळांमधील 90 टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने होणार आहेत, तर 5 टक्के प्रवेश महापौरांच्या शिफारसीनुसार दिले जाणार आहेत. तसेच 5 टक्के प्रवेश महापालिका कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. या प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.

या ठिकाणी सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु होणार (पालिकेचा विभाग : शाळा)

जी-उत्तर : भवानी शंकर रोड शाळा एफ-उत्तर : कानेनगर, मनपा शाळा के-पश्चिम : प्रतीक्षा नगर मनपा शाळा एल : तुंगा व्हिलेज, नवीन इमारत एन : राजावाडी मनपा शाळा एम-पूर्व 2 : अझीज बाग मनपा शाळा पी-उत्तर : दिंडोशी मनपा शाळा पी-उत्तर : जनकल्याण नवीन इमारत टी : मिठानगर शाळा, मुलुंड एस : हरियाली व्हिलेज, मनपा शाळा, विक्रोळी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने जोगेश्वरीतील पूनमनगर शाळेत यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या सीबीएसई शाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्या अनुभवाच्या आधारे पालिकेने इतर ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, पालिकेच्या 10 शाळांमध्ये शिशुवर्ग ते सहावीपर्यंत एकेक तुकडी सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.

हेही वाचा

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

BEST | खासगीकरणाला विरोध करणारी मुंबईकरांची ‘बेस्ट’ भाडेतत्वावर बसेस घेणार

(BMC will start 10 CBSE Board schools in Mumbai, Aditya Thackeray’s Concept)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.