Gunaratna Sadavarte : ‘वकिलीच्या प्रॅक्टिसच्या करण्याच्या बेसिक गोष्टी माहित आहे का?’, मुंबई हायकोर्टाचाही गुणरत्न सदावर्तेंना झटका!

गुणरत्न सदावर्तेंनी वकिली पेशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलनं शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या निर्णयाला सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. या सुनावणीमध्ये सदावर्तेंना झापलं आहे.

Gunaratna Sadavarte : 'वकिलीच्या प्रॅक्टिसच्या करण्याच्या बेसिक गोष्टी माहित आहे का?', मुंबई हायकोर्टाचाही गुणरत्न सदावर्तेंना झटका!
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 7:43 PM

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंनी वकिली पेशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलनं शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या निर्णयाला सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. या सुनावणीनंतरही हायकोर्टाने सदावर्ते यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. सदावर्ते यांच्या निलंबनास स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलकडे अपील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुनावणीवेळी कोर्टाने सदावर्ते यांना वकीलीच्या बेसिक नियमांची आठवण करून देत झापलं आहे.

वकिलीची प्रॅक्टिस करण्याच्या बेसिक गोष्टी तरी तुम्हाला माहित आहे का? अस सवाल न्यायमूर्ती पटेल यांनी केला. जेव्हा सिनियर युक्तिवाद करत असेल तेव्हा ज्युनियर यांनी बोलायचं नसत असंही न्यायमुर्ती म्हणाले. सुनावणी दरम्यान व्हीडिओ, पेन ड्राइव्ह, उलटतपासणी याचा वारंवार उल्लेख मात्र न्यायमूर्ती बोलत असताना, सतत मध्ये मध्ये बोलत असल्यानं, सदावर्तेंवर न्यायमूर्ती संतप्त झाले होते.

सदावर्ते प्रकरणात सुनावणी असताना कोर्ट रूममध्ये मोठी गर्दी झाली होती. बार अँड कौन्सील आफ महाराष्ट्र आणि गोवा तर्फे कारवाई असल्यानं, वकिलांची मोठी उपस्थिती होती. बाजू मांडताना सदावर्ते यांची भाषा आक्रमक, आवाजही मोठा होता यामुळे न्यायमूर्ती गौतम पटेल अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी सदावर्ते यांना काही सांगणाऱ्या त्यांच्या पत्नी ऍड जयश्री पाटील यांनाही कोर्टानं समज दिली. न्यायमूर्ती गौतम पटेल, न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

माझ्यावर कारवाई करताना निर्धारित नियमाचा पालन न करता, माझी बाजू मांडायची संधी दिली गेली नाही. आदेशात उल्लेख केलेल्या व्हीडिओ, पेन ड्राइव्हची प्रत मला न देता, ट्रान्सक्रिप्ट नं देता माझ्यावर कारवाई केली, हा माझ्यावर अन्याय झाल्याचं गुणरत्न सदावर्ते युक्तिवादात म्हणाले.

सुनावणीनंतर, सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. सदावर्ते यांना निलंबना विरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे हायकोर्टाकडून निर्देश दिले आहेत. जर तिथेही न्याय न मिळाल्यास पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा कायम आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.