Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boys Drown : जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी 1 बालकाची सुटका करण्यात आली असून, उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. त्या क्षणी तेथे किती मुले होती आणि ती पाण्यात बुडाली आहेत की इतरत्र गेली आहेत, त्याचा शोध अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत.

Boys Drown : जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू
जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडालेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 9:02 PM

मुंबई : या पावसाळ्याच्या (Rain) दिवसात पाण्यात खेळण्याचा मोह काही केल्या मुलांना आवरत नाही. त्यामुळे आत्ताच्या दिवसात समुद्रकिनारची (Juhu Beach) गर्दी ही वाढलेली पाहायला मिळते. अनेक मुलं बीचवर खेळण्यासाठी येतात. कधी कधी ती समुद्राच्या पाण्यातही उतरतात. मात्र योग्य काळजी न घेतल्या हेच महागात पडून शकतं. याचच एक उदाहरण आज मुंबईतल्या जुहू बीचवर पहयाला मिळालं आहे. कारण मुंबईतील जुहू बीचवर आज दुपारी साडेतीन वाजता पाण्यात खेळताना तीन मुले बेपत्ता (Boys Drown) झाली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी 1 बालकाची सुटका करण्यात आली असून, उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. त्या क्षणी तेथे किती मुले होती आणि ती पाण्यात बुडाली आहेत की इतरत्र गेली आहेत, त्याचा शोध अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत.

बीएमसीने काय माहिती दिली?

मुंबईतील जुहू बीचवर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एफआरटी पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. नौदलाकडूनही यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

नेमका प्रकार काय घडला?

मुंबईतल जुहू चौपाटीवर काही तासांपूर्वी अमन सिंह, वय 21 वर्षे, कौस्तुभ गणेश गुप्ता, वय 18 वर्षे, तसेच प्रथम गणेश गुप्ता, वय 16 वर्षे असे तिघेजण खेळण्यासाठी गेले होते. मात्र खेळता खेळता ते पाण्यात गेले. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसात समुद्रही जास्त खवळलेला आहे. समुद्रावर मोठ मोठ्या लाटा आहेत. अशा लाटात सहज पोहणे शक्य होत नाही. अशा लाटा या किनाऱ्यावरील पाण्यातल्या मानला समुद्रात ओढून नेताता. तसाच काहीसा प्रकार याही मुलांसोबत घडला आहे. त्यामुळे हा घटनेने या परिसरातही खळबळ माजली आहे. पावसाळ्याच्या दिवसात आणि इतर वेळीही समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्डही तैनात असतात. मात्र काही जणांकडून नियम मोडून पाण्यात उतरण्यासारखे प्रकार घडतात. मात्र हेच प्रकार नंतर डोकेदुखी वाढवतात. त्यामुळे या दिवसात तर समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताना विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.