Breaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

एमपीएससी आयोगाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. अखेर दोन वर्षांनंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. 4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरदरम्यान या मुलाखती होणार आहेत.

Breaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर
एमपीएससी आयोग
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 10:44 PM

मुंबई : एमपीएससी आयोगाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. अखेर दोन वर्षांनंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. 4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरदरम्यान या मुलाखती होणार आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यानं नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून जोरदार हल्ला चढवण्यात आला होता. (MPSC announces interview program for Maharashtra Engineering Service 2019 posts)

त्याचबरोबर एमपीएससी भरतीसंदर्भात 30 तारखेच्या आत मंजूर पदांचा आढावा घेऊन एमपीएससीला मागणीपत्र पाठवा असा निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांना दिले आहेत. राज्य सरकार एमपीएससी आयोगाला जागेसंदर्भात मागणीपत्र देत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात होता. विद्यार्थ्यांची मागणी पाहता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत मागणीपत्र सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता 30 तारखेच्या आत मागणीपत्र सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राज्य शासनातील साडे पंधरा हजार पदांची भरती करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला होता. त्यासाठी ‘एमपीएससी’ आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सातत्याने बैठका घेत, या भरती प्रक्रियेतील त्रुटी आणि अडचणी दूर करत त्याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने केला. त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती मिळाली.

राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली. सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले.

एकूण 15 हजार 511 रिक्त पदे भरण्यात येणार

राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देशसंबंधित विभागाला दिले होते. त्यासाठी मंत्रालयात सातत्याने बैठका घेतल्या होत्या. राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया गतिमान करण्यासाठी, एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा भरण्यात आल्या. त्याचाही विशेष पाठपुरावा अजितदादांनी केला होता. 2018 पासून एमपीएससीद्वारे भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील गट ‘अ’च्या 4 हजार 417, गट ‘ब’ च्या 8 हजार 31 आणि गट ‘क’ च्या 3 हजार 63 अशा तीन संवर्गातील एकूण 15 हजार 511 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये वेळेनुसार वाढच होणार आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चित्रा वाघ आक्रमक, महाविकास आघाडी सरकारकडे महत्वाची मागणी

MPSC announces interview program for Maharashtra Engineering Service 2019 posts

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.