Exclusive: दिशा सालियान १४व्या मजल्यावरून पडली तेव्हा अंगावर कपडे… तिघांनी पाहिले
दिशा सालियन प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. दिशा जेव्हा १४व्या मजल्यावर खाली पडली तेव्हा तिच्या अंगावर कपडे होते. तसेच तिघांनी तिला पडताना पाहिले होते.

बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियानच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा जेव्हा १४व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला जणांनी पडताना पाहिले. तसेच दिशाचा अंगावर कपडे असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
गाडीत बसलेल्या दोन तरुणांनी दिशाला पडताना पाहिले
दिशा सालियन १४ व्या मजल्यावरून पडली तेव्हा ती इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर असलेल्या फुटपाथजवळ पडली. तिच्या बिल्डींगबाहेर पार्क केलेल्या म्हणजे जवळपास २० फूट लांब असलेल्या एका गाडीच्या अगदी समोर ती पडली होती. ज्या गाडीच्या समोर दिशा अचानक कोसळली त्या गाडीत दोन ते तीन तरुण बसले होते. आवाज ऐकताच तेही हादरले आणि काय कोसळलं बघण्यासाठी गाडीच्या बाहेर आले. त्यांनी दिशाला जखमी अवस्थेत पाहिले.




वाचा: मोठी बातमी! अभिनेत्री दिशा पटाणीमुळे वाढले होते दिशा सालियानचे टेन्शन, नेमकं काय झालं होतं?
पडताना दिशाच्या अंगावर होते कपडे
मात्र मालवणी पोलिसानी या तरुणांचा जबाब नोंदवला आहे. तसेच बिल्डींगच्या वॉचमनचा देखील जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार दिशा जेव्हा १४व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिच्या अंगावर कपडे होते. इमारतीच्या वॉचमन आणि तिसऱ्या मजल्यावरच्या कुटुंबातील सदस्यही खिडकीतून काहीतरी पडल्याचं आवाज ऐकून खाली उतरल्याचं पोलिसानी म्हटलं आहे. दिशा खाली कोसळल्यानंतर खिडकीतून पाहताच तिच्या घरी असणारे सर्वजण खाली उतरले आणि दिशाला खासगी गाडीतून तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
दिशाला जखमी अवस्थेत आधी एव्हरशाईन नर्सिंग होम आणि नंतर तुंगा हॉस्पिटलला नेण्यात आले होते. मात्र दोन्ही हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दिशाला मृत घोषित करण्यात आले. पोलिसानी तपासादरम्यान एव्हरशाईन नर्सिंग होम, तुंगा हॉस्पिटल आणि शताब्दी रुग्णालयातल्या कर्मचारी व डॉक्टरांचेही जनाब नोंदवले होते.
दरम्यान ज्या गाडीच्या समोर दिशा पडली होती त्यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याचे तपासात समोर आले होते. क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याआधी पोलिसांनी जवळपास १०० ते १५० जबाब नोंदवले आहेत. यामध्ये ज्या गाडीच्या समोर दिशा सालियन कोसळली त्या गाडीत असणारे तरुण, इमारतीचा वॉचमन, इमारतीतील काही सदस्यांचाही जबाब आहे. तपासाच्या जवळपास ८ महिन्यांनंतर या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला होता. हा रिपोर्ट मंजूर झालेला आहे. मात्र एसआयटी स्थापन झाल्याने सध्या नव्याने तपास सुरू आहे जो अद्याप प्रलंबित आहे.