AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे तीन लाख कुटुंबांना मोफत शिधा

बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur to provide food in Virar) यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी मोठी घोषणा केली.

हितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे तीन लाख कुटुंबांना मोफत शिधा
| Updated on: Mar 28, 2020 | 5:03 PM
Share

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur to provide food in Virar) यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी मोठी घोषणा केली. वसई-विरार-नालासोपारामध्ये एकही नागरिक उपाशीपोटी झोपणार नाही, प्रत्येकाला घरपोच अन्न मिळेल, अशी ग्वाही हितेंद्र ठाकूर यांनी दिली. (Hitendra Thakur to provide food in Virar) वसई-विरार या भागातील साडेतीन लाख रेशनकार्डधारक कुटुंबांना मोफत शिधा/जेवण त्यांच्या घरी मिळणार आहे. त्यांच्या शिधेची रक्कम शिधावाटप दुकानदारांना हितेंद्र ठाकूर यांचा जीवदानी ट्रस्ट आणि त्यांच्या अन्य स्वयंसेवी संस्था चेकच्या माध्यमातून देणार आहेत.

वसई,विरार आणि नालासोपरातील हॉटेलमधील जवळपास 500 ते 700 रूम विलगिकरणासाठी सज्ज आहेत. वसई तालुक्यात दोन कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. पण ते स्थानिक नाहीत. आपत्कालीन यंत्रणा राबवताना सर्वांनीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.

हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी आज विवा कॉलेजमध्ये स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. काही अंतर ठेऊन अधिकारी बसले होते. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळाले.

वसईत दोन कोरोनाबाधित रुग्ण वसई ताल्युक्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने निर्जंतुकीरण मोहीम सुरू केली आहे. धूर, केमिकलयुक्त फवारणी करून प्रत्येक सोसायटी, गॅलरी, खिडकी, गेट यांच्यावर फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

महापौर प्रवीण शेट्टी , स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत हे या मोहिमेवर लक्ष ठेऊन आहेत. मागच्या दोन दिवसात विरार पूर्व विवा जहांगीर कॉम्प्लेक्स मधील 50 च्या वर इमारतींना दोन दिवसात निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

आता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी जप्त  

निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण, औरंगाबादेत 50 डॉक्टर्ससह 527 पदांची मेगाभरती

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.