Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नाही, मी काही ज्योतिषी नाही; दरेकरांची ‘युती’वर सावध प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नाही, मी काही ज्योतिषी नाही; दरेकरांची 'युती'वर सावध प्रतिक्रिया
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 5:07 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहेच पण पक्षांतर्गत देखील विसंवाद असल्याचे दिसून येत असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. (Can’t predict what will happen tomorrow in politics, I’m not an astrologer; Pravin Darekar’s cautious reaction about BJP-Shiv Sena alliance)

माध्यमाशी आज संवाद साधताना दरेकर म्हणाले की, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत नेमकं काय चाललंय हे दाखवणारे पत्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कशाप्रकारे शिवसैनिकांना किंबहुना कार्यकर्त्यांना वागणूक दिली जाते त्यासंदर्भात प्रताप सरनाईक यांचे पत्र असावे, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

मविआ मधील विसंवादाची अनेक उदाहरणं देता येतील, असे सांगताना दरेकर म्हणाले, खेड येथे पंचायत समितीचे सभापती शिवसेनेचे असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी अविश्वास दाखवत सत्तेवरून राजकारण केले. त्यावेळेस संजय राऊत यांनी राजकीय वक्तव्ये सुद्धा केली, आमदार राष्ट्रवादीचा असला तरी आम्ही त्यांच्या विरोधात लढू, असे वक्तव्य केले असताना एका बाजूला महाविकास आघाडी घट्ट आहे असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी विरोधात लढू असं सांगायचं. अशा प्रकारच्या दुहेरी भूमिका शिवसेनेकडून घेतल्या जात असल्याचं दिसून येत आहे.

परभणीचे खासदार बंडू जाधव, संजय जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात गटतटीचे प्रकार होत आहे. त्यामुळे येथे प्रशासक नेमण्याचे त्यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्र दिले. उद्धव ठाकरे यांनी हा त्यांचा राजीनामा थांबवून तुमच्या मनाप्रमाणे होईल, असे सांगितले, परंतु प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी नेत्यांनी तेथे प्रशासक नेमला असेही दरेकर यांनी सांगितले.

भाजप-शिवसेना युती होईल का? दरेकर म्हणतात…

भाजप शिवसेनेची युती होईल का? असे विचारले असताना दरेकर म्हणाले, हिंदुत्व भाजपच्या विचारधारेचा भाग आहे. हिंदुत्वाला पूरक जर काही होत असेल तर ते स्वागतार्ह असेल. परंतु या पत्राच्या आधारावर उद्या युती होईल, असे काही समजायचे कारण नाही. राजकारणात भविष्यात किंबहुना उद्या काय होईल हे सांगता येत नाही. मी काही ज्योतिषी नाही. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्याला किंवा नेत्याला आपला पक्ष प्रमुख किंवा पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असेल तर काही गैर नाही, प्रत्येक पक्षात मतमतांतर सुरूच असते, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

भाजप मराठी माणसाच्या पाठीशी

मराठी मतदार हा विशिष्ट मतदार विभागासाठी किंबहुना पक्षासाठी राहीला नाही. भाजपचे 82 नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले, त्यावेळेस मराठी मतदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनाधार भाजपला दिला. तसेच मनसेला सुद्धा मराठी माणूस मतदान करतो, त्यामुळे मराठी मतदार म्हणजेच फक्त शिवसेनेला मतदान करणार असे काही नाही. मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी जो पक्ष काम करतो त्याला मराठी माणूस जनाधार देत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकाराच्या काळात पाच वर्षाच्या कालावधीत मुंबईला अनेक विकासकामे दिली. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी त्यांनी अनेक दिशादर्शक भूमिका घेतल्या. भाजप मराठी माणसाच्या मागे उभा असतो आणि नेहमी उभा राहील, अशी भूमिका दरेकर यांनी स्पष्ट केली.

संबंधित बातम्या:

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…

“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण माफी मिळणार नाही”

पुण्यातील गर्दीला अजित पवार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक

Can’t predict what will happen tomorrow in politics, I’m not an astrologer; Pravin Darekar’s cautious reaction about BJP-Shiv Sena alliance

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.