Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sujit Patkar: संजय राऊत यांचे मित्रही आता कारवाईच्या रडारवर; लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांवर गुन्हा; 38 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sujit Patkar: संजय राऊत यांचे मित्रही आता कारवाईच्या रडारवर; लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांवर गुन्हा; 38 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 8:45 AM

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्यावर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये 38 कोटींची फसवणूक (Lifeline Hospital 38 crore fraud) करुन घोटाळा केल्याप्रकरणी तक्रारदार किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे व्यावसायिक मित्र म्हणून ओळखले जाणाऱ्या सुजित पाटकर यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना सुजित पाटकर यांच्याविषयी तक्रार करुन त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती अशी तक्रारही किरीट सोमय्या यांनी केली आहे.

संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावरही 38 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचे मित्रही आता कारवाईच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.

सुजित पाटकर संजय राऊत यांचे मित्र

लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये 38 कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र आणि त्याचे निकवटवर्ती सुजित पाटकर यांच्यासह आणखी तिघांवर आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये 38 कोटींचा घोटाळा असल्यामुळे आता याबाबत संबंधित यंत्रणांकडूनही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

खोटी व बनावट पार्टनरशीप

किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, जून 2020 ते मार्च 2022 या कालावधीत लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म व फर्मचे भागीदार हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू साळुंखे यांनी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील वेगवेगळ्या जंबो कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी काढलेल्या बिडस मिळविण्यासाठी यांनी फर्मचे 26 जून 2020 रोजीचे बनावट व खोटे पार्टनरशीप तयार केली. ही पार्टनरशी खोटे व बनावट असल्याचे माहिती असतानाही त्यांनी ही कागदपत्रं सादर केली आहेत.

मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव नाही

तसेच तसेच फर्मकडे वैद्यकीय मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव व ज्ञान नसतानाही त्यांच्याकडे अनुभव असल्याचे खोटे भासवून वरळी व दहिसर जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त केले होते. तसेच त्यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस फर्मला 9 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी त्यांना कंत्राट न देण्याबाबत लेखी कळविलेले होते. मात्र त्यांनी ही बाब जाणीवपूर्वक मुंबई महानगरपालिका यांच्यापासून लपवून मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरचा वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राट प्राप्त केले, लाईफलाईन फर्मने कंत्राटमधील नमूद असलेल्या अटी व शर्तीनुसार सेवा व सोयी न पुरवता त्याबाबत हयगय केल आहे.

रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत

जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूतही हेच झाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या रक्कमेमध्ये घोटाळा केला असून कंत्राटाच्या माध्यमातून अंदाजे 38 कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार त्यांच्यावर केली आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.