AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील नाले, गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच, दंडात्मक कारवाई होणार

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील पावसाचे पाणी सुयोग्य प्रकारे वाहून जावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने अधिकाधिक प्रभावी प्रयत्न करत असते.

मुंबईतील नाले, गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच, दंडात्मक कारवाई होणार
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 6:34 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील पावसाचे पाणी सुयोग्य प्रकारे वाहून जावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने अधिकाधिक प्रभावी प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्या, नाले आणि नद्या इत्यादींची नियमितपणे साफ-सफाई केली जाते. तथापि, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक, वस्तू, कचरा इत्यादी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्मा होतो. परिणामी पाणी तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, सभागृहनेता विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या अनुषंगाने विविध स्तरीय जनजागृती करण्यासह अधिक प्रभावी दंडात्मक कारवाई करण्याचे आणि सीसीटिव्हीद्वारे देखील निगराणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले होते. (CCTV cameras will watch those who dump garbage in drains and gutters in Mumbai area, strict action will be taken)

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत यथोचित कार्यवाही सुरु करण्याचे आदेश महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याला दिले आहेत. या आदेशांनुसार आता मनपा प्रशासनाने याबाबत सर्वस्तरीय जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याचे सूतोवाचही केले असून प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, कचरा इत्यादी नाल्यांमध्ये टाकणाऱ्या व्यक्तींवर मनपा उप विधीनुसार 200 रुपये इतकी दंड आकारणी अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही द्वारे देखील नियमितपणे अवलोकन करून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची बाबदेखील प्रशासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवलं जाणार?

आपल्या क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सातत्याने अधिकाधिक प्रभावी व्यवस्था करीत असते. याअंतर्गत प्रामुख्याने पर्जन्य जलवाहिन्या, नाले इत्यादींची साफसफाई करणे; नवीन पर्जन्य जलवाहिन्या तयार करणे आणि त्यांचे परिरक्षण करणे इत्यादी कामे नियमितपणे करण्यात येतात. तथापि, नाले साफ केल्यानंतरही त्यात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नाल्यात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. विशेष करून प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या बाबींना प्रतिबंध होण्यासह संबंधितांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल व्हावा, या उद्देशाने आता जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यासह दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याची बाब महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबईत 689 किमी लांबीचे नाले

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची लांबी एकूण सुमारे 689 किलोमीटर आहे. यापैकी मोठ्या नाल्यांची लांबी ही सुमारे 248 किलोमीटर इतकी आहे. तर छोट्या नाल्यांची लांबी ही सुमारे 421 किलोमीटर इतकी आहे. याव्यतिरिक्त उर्वरित 20 किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे, अशीही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आली आहे.

इतर बातम्या

मुंबई मनपाकडून खासगी लसींचे दर जाहीर, कोव्हिशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, तर स्पुतनिक व्हीची किंमत किती?

Weather Report | महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार, पुण्यात पावसाची विश्रांती

(CCTV cameras will watch those who dump garbage in drains and gutters in Mumbai area, strict action will be taken)

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.