CCTV Video : मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी मध्यरात्री 1 वाजता पार्क!

स्फोटकांनी भरलेल्या या स्कॉर्पिओ गाडीबाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गाडी बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आली होती.

CCTV Video : मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी मध्यरात्री 1 वाजता पार्क!
सीसीटीव्ही फुटेजमधये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्याचे निष्पन्न झाले होते.
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 9:48 PM

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ स्फोटकानं भरलेली गाडी आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एक राखाडी रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या तब्बल 20 कांड्या सापडल्या आहेत. तसंच एक धमकीचं पत्रही या गाडीमधून मिळाल्याची माहिती मिळतेय. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, स्फोटकांनी भरलेल्या या स्कॉर्पिओ गाडीबाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गाडी बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे.(A car full of explosives parked near Mukesh Ambani’s house at midnight)

फक्त 1 नव्हे तर 2 गाड्या!

अंबानी यांचं घर दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहे. या परिसरात बुधवारी मध्यरात्री राखाडी रंगाची एक स्कॉर्पिओ दाखल झाली. नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या ठिकाणीच ही गाडी उभी होती. महत्वाची बाब म्हणजे या स्कॉर्पिओ गाडीसोबत त्या ठिकाणी अजून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीही होती. इनोव्हा गाडी ही बरोबर स्कॉर्पिओच्या मागेच होती. अंबानी यांच्या घराजवळ या दोन्ही गाड्या दाखल झाल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीची लाईट बंद करण्यात आली. त्यानंतर मागे थांबलेली इनोव्हा गाडी स्कॉर्पिओ गाडीच्या काहीशी पुढे निघून गेली.

काही वेळ गाडीतून कुणीही उतरलं नाही!

काही वेळ गेला तरी स्कॉर्पिओ गाडीतून कुणीही खाली उतरलं नाही. 30 सेकंदाच्या फरकाने त्या ठिकाणावरुन एक टॅक्सीही पास झाल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतील व्यक्ती उतरते आणि पुढे उभी असलेल्या इनोव्हा गाडीत बसते आणि तिथून ती इनोव्हा गाडी निघून जाते, अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.

एका दुकानाच्या सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद

अंबानी यांच्या घराजवळ जिथे गाडी उभी होती. तिथे समोरच एक दुकान आहे. त्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. ज्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला त्या दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, गाडीत नेमके किती लोक होते हे कळू शकलेलं नाही. पण स्कॉर्पिओ गाडीत ड्रायव्हिंग करताना एक व्यक्ती दिसतो. संबंधित दुकानदाराने सकाळी साडे आठच्या सुमारास दुकान उघडलं. त्यानंतर दुपारी 12 नंतर ट्राफिक पोलिसांचे कर्मचारी आले आणि त्यांनी गाडीच्या चाकाला लॉक लावलं. त्यानंतर दुपारी 3 वाजता पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि अन्य यंत्रणा आली आणि त्यांनी गाडीचा तपास सुरु केल्याचं या दुकानदाराने सांगितलं.

स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या, एक धमकीचं पत्र!

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या आणि स्फोटकांनी भरलेल्या गाडीत जिलेटीनच्या तब्बल 20 कांड्या सापडल्या आहेत. तशी माहिती खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच दिली आहे. इतकच नाही तर या गाडीमध्ये एक धमकीचं पत्रही मिळालं आहे. यात कुठल्याही दहशतवादी संघटनेचं नाव नाही. मात्र, हा केवळ इशारा असल्याचंही या पत्रात म्हटलं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात आल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

A car full of explosives parked near Mukesh Ambani’s house at midnight

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.