‘घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’, शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचं आवाहन

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरातूनच साजरा करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय.

'घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन', शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचं आवाहन
खासदार संभाजी छत्रपती
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 10:59 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी 2 दिवसांपूर्वी शिवभक्तांना मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. दुर्दैवानं यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरातूनच साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसंच तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू आणि पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे राजसदरेवरुन घोषित करेन, असं आश्वासनही त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे. (MP SambhajiRaje Chhatrapati’s appeal to All shivbhakta)

संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन

‘मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज ! दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत’, असं संभाजीराजे म्हणाले.

‘न्यायाची बाजू, पुढील दिशा राजसदरेवरुन घोषित करेन’

त्याचबरोबर ‘सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी..! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन’, असंही संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

नाशिकमधून रायगडाकडे कूच करण्याचं आवाहन!

संभाजीराजे छत्रपती यांनी 1 जून रोजी नाशिकमधून आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला होता. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे संभाजीराजे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना सांगितले होतं.

‘शिवराज्याभिषेक दिन’ सर्व महाविद्यालयांत साजरा होणार

यावर्षीपासून राज्यातील सर्व महाविद्यालये, खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. त्याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सरकारच्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंना देण्यात आली. त्यामुळे 6 जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन यंदा राज्यभरात साजरा केला जाणार आहे.

राज्यातील सर्व महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याबाबत ठाकरे सरकारकडून अध्यादेश काढण्यात आलाय. या दिवशी शिवकालीन विषयांवर महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती सामंत यांनी दिलीय. राज्य सरकारच्या या उपक्रमाबद्दल आभार मानतानाच संभाजीराजे यांनी या निर्णयाचं स्वागतही केलंय. हा दिवस खरंतर राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा. महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती आजच्या पिढीला मिळायला हवी. महाराजांच्या आजार आणि विचारांचा प्रसार व्हायला हवा. ही त्याचीच सुरुवात असल्याचं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

Sambhajiraje Chhatrapati : “6 जूनपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार”

Breaking : ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करुन काय साध्य होणार?’ खासदार संभाजीराजेंचा सवाल

MP SambhajiRaje Chhatrapati’s appeal to All shivbhakta

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.