कोरोना लसीचा तुटवडा संपवण्यासाठी रोहित पवारांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…
महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 7,40,000 लशी आल्या आहे. तर लस वाटपात केंद्राने भाजपशासित राज्यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. | Rohit Pawar
मुंबई: राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करून भाष्य केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक उपाय सुचवला आहे. (NCP leader Rohit Pawar on coronavirus vaccination drive in Maharashtra)
कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय. त्यामुळे राज्याला एकत्रच 3-4 कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले.
कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय.त्यामुळं राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा. pic.twitter.com/rFWpTwa97s
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 8, 2021
केंद्राचा महाराष्ट्राबाबत पुन्हा दुजाभाव
महाविकासआघाडी सरकारच्या आग्रही मागणीनंतर केंद्र सरकारने गुरुवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यांना कोरोना लसींचे वाटप केले. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 7,40,000 लशी आल्या आहे. तर लस वाटपात केंद्राने भाजपशासित राज्यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाकाठी 4 लाख लोकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारकडून वेगाने पुरवठा झाला तर ही संख्या आठ लाखापर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. तरीही केंद्र सरकारने महाराष्ट्राला अवघ्या 7,40,000 लसी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी काय म्हटले होते?
कोरोनावरील लसीच्या तुटवड्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोप निव्वळ खोटे आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून आपण गेल्या वर्षभरापासून बघतोय, महाराष्ट्र सरकार ढिसाळपणे काम करत असून करोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची चालढकल सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या या उदासिन भूमिकेमुळे करोना व्हायरसविरोधातील लढाईत सुरू प्रयत्नांना धक्का बसला आहे, असा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
वास्तव नाकारुन चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे, सहकार्य करा: शरद पवार
पंतप्रधान मोदींनी लस घेताना ‘ती’ चूक टाळली; वाचा मोदींनी नक्की काय केलं?
(NCP leader Rohit Pawar on coronavirus vaccination drive in Maharashtra)