Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर
मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून रविवारी हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून रविवारी हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मेन लाईवर मेगाब्लॉक नसेल. सी. एस. एम. टी. – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर स. 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत व चुनाभट्टी/वांद्रे – सी.एस. एम. टी. अप हार्बर मार्गावर स. 11.10 ते सायं. 4.10 पर्यंत मेगाब्लॉक सुरु राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं (Central Railway) ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
नेमका कसा असेल मेगाब्लॉक
सी. एस. एम. टी. ते कल्याण मेन लाईनवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसून सी. एस. एम. टी. – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर स. 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत व चुनाभट्टी/वांद्रे – सी.एस. एम. टी. अप हार्बर मार्गावर स. 11.10 ते सायं. 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
मध्य रेल्वेचं ट्विट
रविवार दि. २०.३.२०२२ रोजी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मेन लाईनवर मेगाब्लॉक नाही. pic.twitter.com/veaM0fYhN9
— Central Railway (@Central_Railway) March 19, 2022
मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्यानं उद्या म्हणजेच 20 मार्चला घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं कळवण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून विविध देखभालीची काम करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. उद्या असणाऱ्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
MIM बाबत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? सुप्रिया सुळे म्हणतात विकासासाठी…