मुंबई पालिकेवर डोळा? भाजपकडून राज्यसभा लढण्याची घोषणा, कोण आहेत उमेदवार संजय उपाध्याय?

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. (sanjay upadhyay)

मुंबई पालिकेवर डोळा? भाजपकडून राज्यसभा लढण्याची घोषणा, कोण आहेत उमेदवार संजय उपाध्याय?
sanjay upadhyay
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 12:50 PM

मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil announce sanjay upadhyay name for rajya sabha seat)

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.

कोण आहेत संजय उपाध्याय

संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपने घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुश्रीफ यांना ऑफर नव्हती

चंद्रकातदादांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारली. त्यानंतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा. माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, टीव्ही 9 ला सोबत घ्यायचं, कुठलीतरी परिस्थिती दाखवायची. मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असंही ते म्हणाले.

6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

राजीव सातव यांच्या निधनानं जागा रिक्त

काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. (chandrakant patil announce sanjay upadhyay name for rajya sabha seat)

संबंधित बातम्या:

‘मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर’, मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचा पलटवार

सोमय्यांच्या टार्गेटवर ठाकरेंचे बंगले; अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार

(chandrakant patil announce sanjay upadhyay name for rajya sabha seat)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.