Chandrakant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात “जात” कुणी आणली? राज ठाकरेंचं खरंय, चंद्रकांत पाटलांचा सुरात सूर

राष्टवादीच्या उदयानंतर जातीयवाद वाढला, असा थेट आरोप राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केला. त्याला राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही यात उडी घेतली आहे.

Chandrakant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात जात कुणी आणली? राज ठाकरेंचं खरंय, चंद्रकांत पाटलांचा सुरात सूर
महाराष्ट्राच्या राजकारणात "जात" कुणी आणली?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:59 PM

पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून जातीय राजकारणावरून वाद सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा शिवतीर्थावरील गुढी पाढव्याच्या सभेत आणि ठाण्यातल्या सभेत याच मुद्द्यावरून शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल चढवला. राष्टवादीच्या उदयानंतर जातीयवाद वाढला, असा थेट आरोप राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केला. त्याला राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही यात उडी घेतली आहे. राज ठाकरे बरोबर सांगत आहेत म्हणत त्यांनीही राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळा आहे. तर राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा पायंडा नव्हता. मात्र कोणी निर्माण केलाय हे राजसाहेब सारखं सांगत आहेत. ते म्हणत असतील की मी नाही… मी नाही मात्र सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आणि पवारांवर टीका केली आहे.

हिंदुत्वावरून सेनेवर हल्लाबोल

तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्षरित्या टोलेबाजी केली आहे. भगव्याच कोणाला पेटंट दिलेलं नाहीये. देवेंद्रजींना वेगळा मुद्दा मांडला. हिंदू या शब्दावर किंवा आर्य बाहेरून आले. मात्र हे मिथ्य आहे चुकीचं आहे, असे फडणवीसांनी सांगितलं, किती वार देवेंद्रजींवर चाललेत, पक्षावर चालले, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे तसेच. फडणवीसांनीही महाविकास आघाडी आणि सेनेला टार्गेट केले आहे.

संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोलेबाजी

त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे. भाजप बाबत किती अज्ञान असावं. ही पार्टी 80 साली स्थापन झाली असं काही महाभागांना वाटतं, जे रोज टीव्हीवर बाईट देतात. आम्ही पार्टी गावोगावी नेली असं ते म्हणतात. एक खोटं सकाळी एकाने बोललं की दिवसभर अनेकांनी बोलायचं आणि ते संध्याकाळ पर्यंत खरं वाटायला लागतं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

जगातील सर्वात जुनी संस्कृती भारतीय संस्कृती आहे. ऋग्वेद 9 हजार वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे. आमच्यासारखी जुनी भाषा नाही. हिंदुत्व भारतीय इतिहासाशी जोडलेल आहे. मात्र अनेकांनी हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. आम्ही अशी कुठली शाल पांघरलेली नाही आमचं खरं हिंदुत्व आहे, असे म्हणत त्यानी शिवसेनेला टोलेबाजी केली आहे. तसेच रशिया आणि युक्रे मध्ये मध्यस्थी मोदी करू शकतात असं रशियाला देखील वाटतं, असेही फडणवीस यांनी आवर्जुन सांगितलं आहे.

Jayant Patil: आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही, मंत्री नंतर आधी कार्यकर्ता: जयंत पाटील

Sanjay Raut Ayodhya Visit : ‘अयोध्या ही आमची पायवाट, तारीख लवकरच जाहीर करु’, संजय राऊतांचा दावा; मनसे, भाजपवर पलटवार

Devendra Fadnavis : भ्रष्टाचाराच्या पोलखोलीमुळे हल्ले, फडणवीसांचा आरोप, तर सहानुभूतीचे प्रयत्न, मिटकरींचा पलटवार

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.