कोरेगाव भीमाला जाणार, प्रसंगी न्यायालयात जाऊ: चंद्रशेखर आझाद
महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीची जननी आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद म्हणाले, ( Chandrashekhar Azad Koregaon Bhima)
मुबंई : भीम आर्मीचे प्रमख चंद्रशेखर आझाद तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी जायचे आहे, मात्र सरकारने परवानगी दिली नाही, असं चंद्रशेखर आझाद म्हणाले. कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी न्यायलयात जाण्याची गरज लागली तर न्यायालयात जावू, असा इशारा आझाद यांनी दिला. चंद्रशेखर आझादटीव्ही 9 मराठीशी बोलत होते. ( Chandrashekhar Azad said he will go to Koregoan Bhima)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माननारे लोक कोरेगाव भीमा शौर्य दिवस साजरा करतात. महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीची मातृभूमी आहे. महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा आहे, येत्या काळात येथे आंबेडकरीचळवळ वेगानं वाढेल, असा विश्वास चंद्रशेखर आझाद म्हणाले. महाराष्ट्रात सरकार बदललं आहे. मात्र, जादा फरक झालेला नाही. मागील सरकारच्या तुलनेत हे सरकार बरे आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले. दरवर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याचा निर्धार केला होता. मात्र, गेल्या वर्षी तुरुंगात असल्यामुळे येता आले नाही. मात्र, यावर्षी कोणत्याही परिस्थिती कोरेगावा भीमाला जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले.
सरकारनं शेतकऱ्यांची बाजू ऐकायला हवी होती
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महिनाभर शेतकरी आंदोलन करत आहेत पण सरकार त्यांची बाजू ऐकून घेत नाही. सरकार ज्यावेळी बोलवेल त्यावेळी शेतकरी चर्चेसाठी जातात, पण सरकार त्यांचं म्हणनं ऐकून घेत नाही, असं आझाद म्हणाले. केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागत आहे. सरकारनं आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे होती. काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकार काम करतेय.देशातील शेतकरी जर सुखी असेल तर देश सुस्थितीत राहील. सरकारविरोधात कोणी बोललं तर त्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि केंद्रीय यंत्रणा लावतात. शेतकरी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख आझाद म्हणाले.
चंद्रशेखर आझाद तीन दिवस महाराष्ट्रात
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद सध्या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहला भेट दिली. दादरच्या चैत्यभूमीला, पुण्यात भिडे वाडा येथे भेट देणार आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले. नवीन वर्ष संघर्षानं सुरु होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम करण्याचा निर्धार केल्याचं चंद्रशेखर आझादआझाद यांनी सांगितले.
Video | Chandrashekhar Azad | मुंबईसह महाराष्ट्र दौऱ्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्याशी खास बातचित@BhimArmyChief #Mumbai #ChandrashekharAzad #BhimArmy pic.twitter.com/9ctl3AQWLQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
हेही वाचा:
एल्गार परिषद होणारच, बी जी कोळसे पाटलांची घोषणा, तारीखही जाहीर
कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-नगर महामार्ग 31 डिसेंबर रोजी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
( Chandrashekhar Azad said he will go to Koregoan Bhima)