VIDEO: जलतरण तलावाच्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने; नेते मात्र हास्यविनोदात रमले

कांदिवलीच्या जलतरण तलावाच्या लोकार्पणावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे. या जलतरण तलावाचं उद्या लोकार्पण होणार होतं. भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार होतं.

VIDEO: जलतरण तलावाच्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने; नेते मात्र हास्यविनोदात रमले
जलतरण तलावाच्या लोकार्पणावरून शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने; नेते मात्र हास्यविनोदात रमले
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 5:05 PM

मुंबई: कांदिवलीच्या जलतरण तलावाच्या लोकार्पणावरून शिवसेना (shivsena) आणि भाजप (bjp) कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे. या जलतरण तलावाचं उद्या लोकार्पण होणार होतं. भाजपचे आमदार योगेश सागर (yogesh sagar) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार होतं. पण त्यापूर्वीच महापौर किशोरी पेडणेकर यांनी कांदिवलीत येऊन जलतरण तलावाचं लोकार्पण केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जलतरण तलावाच्या लोकार्पण कार्यक्रमात प्रचंड गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं. हा लोकार्पण सोहळा सुरू असतानाच योगेश सागरही घटनास्थळी दाखल झाले. योगेश सागर यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा केल्या. शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले असताना महापौर किशोरी पेडणेकर आणि योगेश सागर मात्र स्टेजवर हास्य विनोद करताना दिसत होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

कांदिवली पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या सुशोभिकरणाचं काम अनेक वर्षापासून रखडलं होतं. कोविड नंतर या कामाला पुन्हा गती प्राप्त झाली असून या जलतरण तलावाचं काम पूर्ण झालं आहे. या जलतरण तलावाचं उद्घाटन उद्या भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या हस्ते होणार होतं.

 kandivali swimming pool inauguration

kandivali swimming pool inauguration

कांदिवली परिसरात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने भाजप नगरसेवकांनी उद्या या तलावाच्या कामाचं उद्घाटन ठेवलं होतं. मात्र, त्यापूर्वीच महापौर किशोरी पेडणेकर आज कांदिवलीत उद्घाटनासाठी दाखल झाल्या.

 kandivali swimming pool inauguration

kandivali swimming pool inauguration

महापौर आल्याचं कळताच भाजपचे कार्यकर्तेही कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. भाजपचे नेते कार्यक्रमात दिसत नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भाजपच्या या घोषणाबाजीला शिवसेनेनेही घोषणेनेच उत्तर द्यायाला सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव पसरला. पोलिसांनी तात्काळ या कार्यकर्त्यांना पांगवण्याचे प्रयत्नही सुरू केले. मात्र, गर्दी प्रचंड असल्याने जमावाला पांगवणं कठिण जात होतं.

 kandivali swimming pool inauguration

kandivali swimming pool inauguration

त्यानंतर थोड्याच वेळाने योगेश सागर घटनास्थळी आले. महापौर किशोरी पेडणेकर आणि योगेश सागर हे स्टेजवर एकत्र आले. स्टेजच्या खाली दोन्ही पक्षाचे नेते आमने-सामने ठाकत एकमेकांविरोधात घोषणा देत होते. तर महापौर पेडणेकर या सागर यांना काही तरी सांगताना दिसत होत्या. काही वेळा तर या दोन्ही नेत्यांमध्ये हास्य विनोद सुरू असल्याचंही दिसत होते. एकीकडे नेते स्टेजवर गप्पा मारत असताना दुसरीकडे कार्यकर्ते मात्र अधिकच आक्रमक झालेले दिसत होते.

 kandivali swimming pool inauguration

kandivali swimming pool inauguration

गोंधळ काही थांबायाचं नाव घेत नसल्याचं पाहून महापौरांनी हातात माईक घेतला. आता कोणाचाच आवाज असणार नाही. फक्त महापालिकेचाच आवाज असेल. योगेश सागर आणि मी एकाच बॅचमध्ये काम केलं आहे. त्यांच्या मतदारसंघात मी पहिल्यांदा आले. त्यांनी स्वागत केलं. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्याची पद्धत आहे, असं महापौर म्हणाल्या.

 kandivali swimming pool inauguration

kandivali swimming pool inauguration

महापौरांनी नंतर माईक सागर यांच्या हातात दिला. त्यांनीही जय भवानी, जय शिवाजी म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी पेडणेकर यांचा उल्लेख माननीय महापौर महोदया असा केला. खाली मात्र कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरूच होता.

संबंधित बातम्या:

VIDEO: पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा उघड करणार; संजय राऊत कडाडले

किशोरी पेडणेकरांना नितेश राणेंचं तातडीने आव्हान, चला महिला आयोगाकडे, मी येतो बरोबर

केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्तेंवर भाजप गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार ? काँग्रेसचा सवाल, हेमा मालिनींबद्दल म्हणाले…

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....