काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकारचं काम: छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.(Chhagan Bhujbal Agriculture Act)
मुंबई: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार काम का करत आहे हे कळत नाही, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. यासोबतच कोरोना विषाणूचं संकट अजूनही कायम असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.(Chhagan Bhujbal raised question on Central Govts stand on Agriculture act)
सुप्रीम कोर्टानं सांगूनही सरकार तोडगा काढत नाही
कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार का आडमुठी भूमिका घेत आहे कळत नाही, अशी टीका भुजबळ यांनी केली. शेतकरी जगला तर लोक जगू शकतील. सुप्रीम कोर्टानं सांगूनही तोडगा काढायला सरकार तयार नाही. हे अयोग्य आहे, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे. काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार काम करतं का हे कळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्योगपतींच्या हातात जर ही व्यवस्था गेली तर शेतकऱ्यांची पिळणूक होईल. यामुळे सरकारनं यातून मार्ग काढण्याची गरज आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
कोरोनाबाबत खबरदारी घेण्याची गरज
कोरोना विषाणू अजून संपलेलना नसून जगावर कोरोनाचे संकट कायम असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे. या विषाणूच्या संकटातून जोपर्यंत पूर्णपणे आपण यातून बाहेर निघत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोनाविषयक खबरदारी घेणे आवश्यक आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. कोरोनाचं संकट संपेपर्यंत मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग बाळगायला हवं, असं आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.
राज्यात 5 जानेवरीपर्यंत नाईट कर्फ्यू
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (21 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
#नागपूर – राज्यमंत्री बच्चू कडू अखेर चार तासानंतर मुंबईकडे रवाना, शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना, नागपूर पोलिसांनी चार तास रोखलं,अखेर चोख पोलीस बंदोबस्तात बच्चू कडू रवाना https://t.co/SFzFiqwAw7
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
संबंधित बातम्या:
ओबीसी जनगणना ते राष्ट्रवादीतील इनकमिंग; छगन भुजबळांची 6 मोठी वक्तव्ये
Chhagan Bhujbal | सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणे, यात काही गैर नाही: छगन भुजबळ
(Chhagan Bhujbal raised question on Central Govts stand on Agriculture act)