मुख्यमंत्री शिंदे नेमके कसे? बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांना पुन्हा कुणी डिवचले?

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील माताश्री निवासस्थानासमोर बॅनरबाजी करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना डिवचले आहे.

मुख्यमंत्री शिंदे नेमके कसे? बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांना पुन्हा कुणी डिवचले?
UDDHAV VS EKNATH SHINDE
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 5:17 PM

मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा येथील मातोश्री समोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. तर, उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच बॅनरबाजी करून शिंदे गटाने त्यांना आणखी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरु आहे, लवकरच महाविकास आघाडातील कॉंग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या नेत्यांचे महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.

कॉंग्रेस आणि शरद पवार गट यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे हे ही राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक उद्धव ठकारे यांच्या मातोश्री निवासस्थानी हजेरी लावत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात व्यस्त असतानाच शिंदे गटाने अशी बॅनरबाजी करून त्यांना डिवचले आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या ( शिंदे गट ) विभाग क्रमांक ७ च्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि नेते किरण पावसकर तसेच कुणाल सरमळकर यांनी हे बॅनर लावले आहेत. मेहनती, प्रामाणिक आणि निडर अशा आशयाचे हे बॅनर पावसकर आणि सरमळकर यांच्याकडून लावण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा बैठका घेतल्या जात आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी या मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत. यानिमित राज्यातून आलेल्या शिवसैनिकांचे हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठीच हे बॅनर लावण्यात आले आहेत का अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.