सत्तेत आल्यापासून बळीराजाला 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आस्मानी संकटासमोर सगळेच हतबल असतात,  वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी येणाऱ्या पावसांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही काळात गारपीठ, दुष्काळ तर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात येत असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी आतपार्यंत केलेल्या मदतीबाबत विधानसभेत माहिती दिली.

सत्तेत आल्यापासून बळीराजाला 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 7:39 PM

नागपूर : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने हजारो कोटींची मदत केल्याचं  विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. भरपाईचा आकडा सांगितला त्यासोबतच सर्व हिशोब दिला आहे.

जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी मातीत सोनं पिकवतो. मी देखील शेतकऱ्याचा मुलग आहे, पिकाचं नुकसान झाल्यावर काय अवस्था होते याची मला जाणीव होते. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी आणि असो किंवा विरोधक सर्वांना शेतकऱ्यांची काळजी आहे. गेल्या दीड वर्षात म्हणजे सत्तेत आल्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी NDRF च्या दरात दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन हेक्टर ऐवजी मर्यादा तीन हेक्टर केली, जिरायतीसाठी 13,600, बागायतीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 प्रतिहेक्टर या दराने भरपाई दिली आहे. राज्य सरकारने वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय घेत 1851 कोटींचा लाभ शेतकऱ्यांना देत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

जुलै,2022पासून म्हणजे गेल्या फक्त 18 महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत तो मी सांगू इच्छितो. मदत व पुनर्वसन विभागाकडून 14  हजार 891 कोटी रुपये, कृषि विभागाकडून 15 हजार 40 कोटी रुपये, पशुसंवर्धन 243कोटी, सहकार 5 हजार 190 कोटी, पणन 5 हजार 114 कोटी, अन्न व नागरी पुरवठा 3 हजार 800 कोटी अशा रीतीनं एकूण 44हजार कोटीपेक्षा जास्त खर्च आम्ही करत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची विरोधकांना कोपरखळी

गेल्या सरकारच्या काळापेक्षा आम्ही कितीतरी पटीने मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.  शेतकरी अडचणीत असताना आम्ही घरी बसलो नाही. १ रूपयात विमा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.  दादांना शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन झाला नाही म्हणून ते आमच्यात आल्याचं सांगत शिंदेंनी विरोधकांना कोपरखळी मारली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.