Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले वाहतूक कोंडीत, सहायक पोलीस फौजदाराला 100 रुपयांचा दंड

वाहतुकीचे नियमन, नियंत्रणामध्ये कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दोषी कर्मचाऱ्याला 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त जेडगे यांनी हा दंड ठोठावला.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले वाहतूक कोंडीत, सहायक पोलीस फौजदाराला 100 रुपयांचा दंड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले वाहतूक कोंडीत
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 9:27 AM

मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडी हा काही नवीन विषय नाही. पण, मंत्री, मुख्यमंत्री जात असतील, तर आधीच कोंडीवर नियंत्रण आणलं जातं. मुख्यमंत्री एखाद्या रस्त्यानं येणार असतील, तर रस्त्यावरील वाहतूक (Road Traffic) सुरळीत केली जाते. मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा आधी जाऊ दिला जातो. इतरांना थांबविलं जातं. पण, मुख्यमंत्रीचं वाहतूक कोंडीत (traffic jam) अडकत असतील, तर याला वाहतूक पोलिसांना जबाबदार धरलं जातं. असाच प्रकार 22 ऑगस्ट रोजी घटला. या प्रकरणी एका सहायक पोलीस फौजदाराला (Assistant Police Faujdar) 100 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळं वाहतूक पोलीस सतर्क होतील, अशी अपेक्षा आहे. दंडाची रक्कम कमी असली, तरी अशी वाहतूक कोंडी पुढं होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे.

कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनांचा ताफा सकाळी वर्षा निवासस्थानाहून विधानभवनाच्या दिशेनं निघाला. एअर इंडियापासून पुढं साखर भवनापर्यंत ताफा जात असताना वाहतूक कोंडी झाली. त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांची गाडी अडकली. येथील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगी यांच्याकडं सोपविण्यात आली होती. याप्रकरणी एका सहायक पोलीस फौजदाराला जबाबदार धरण्यात आले. वाहतुकीचे नियमन, नियंत्रणामध्ये कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दोषी कर्मचाऱ्याला 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त जेडगे यांनी हा दंड ठोठावला.

पॉईंटवर झाली वाहतूक कोंडी

ही घटना विधीमंडळ अधिवेशन काळात 22 ऑगस्ट रोजी घडली. मुख्यमंत्री यांचा वाहन ताफा नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारतीपासून पुढे साखर भवनपर्यंत जात होता. वांद्रे कुर्ला येथील एका पॉईंटवर वाहतूक कोंडीत मुख्यमंत्री सापडले. रस्त्यात असताना मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी तेथील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सहायक पोलीस फौजदाराला 100 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. संबंधित फौजदाराची गेंडा निवासस्थाने या मार्गावर वाहतुकीची पाइंट येथे नेमणूक केली होती. पण, त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्यानं संबंधित फौजदारास जबाबदार धरण्यात आले.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...