कसबा पोटनिवडणुकाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले…

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी या एका विजयामुळे विरोधकांनी हुरळून जाण्याची गरज नाही असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

कसबा पोटनिवडणुकाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले...
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:38 PM

मुंबईः कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मतदारांनी जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीबद्दल पिंपरी-चिंचवड मतदार संघातील मतदारांचे आभार मानत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना मतदारांनी विजयी केल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदनही केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अश्विनी जगताप यांचा या पोटनिवडणुकीत हा विजय हीच खरी लक्ष्मण जगताप यांनी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळाला नसला तरी यापुढच्या काळात कसब्यातील मतदारांची मनं ही जास्तीची कामं करून मिळवू असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिली.

या निवडणुकीतील त्रुटी उणीवा आणि झालेल्या चुका या पुढील निवडणुकीच्या काळात नक्कीच आम्ही सुधारणा करु असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी कसबेकरांना अश्वासन देताना सांगितले की, कामाच्या जोरावर कसबेकरांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भविष्यामध्ये ज्या काही निवडणुक होतील त्यामध्ये काम करून मोठं यश मिळविणार असल्याचा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी या पोटनिवडणुकीच्या निकालाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

कोणत्याही पोटनिवडणुकीमध्ये तेथील स्थानिक समस्या आणि स्थानिक विषयांना प्राधान्य दिले जाते. जे प्रश्न समोर असतात त्याचा विचार पोटनिडणुकीत केला जातो त्यामुळे पोटनिवडणुकी्वेळी ज्या काही समोर गोष्टी असतात त्याचा विचार केला जातो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकांच्या काही पराभवाने कार्यकर्ते खचून जात नाहीत त्याचप्रमाणे विजयामुळेही विरोधकांनी जास्त हूरळून जाऊ नये असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

आता तरी त्यानी म्हणू नये ईव्हीएम घोटाळा झाला असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. परंतू ज्या काही कार्यकर्त्यांनी काम केले आहे त्यांना त्यांनी धन्यवादही दिले आहे.

कोल्हापूरची निवडणूक ही काँग्रेसने जिंकली आहे तर कसबा महाविकास आघाडीने जिंकली आहे. याप्रमाणेच काही पोटनिवडणुकीत भाजपचा सुद्धा विजय झाल्याचे त्यांनी सांगितले.

कधी काळच्या आमच्या मित्र पक्षांनी म्हणजेच ठाकरे गटाने या विरोधकांनी एवढा मोठा आनंद साजरा केला आहे की, बेगाने शादी में अब्दुला दिवाना अशी परिस्थिती त्यांची आहे अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.

या एका विजयाने विरोधकांनी हुरळून जाता कामा नये कारण तीन राज्यामद्ये भाजप बहुमताने जिंकेलेले आहे त्याच्याकडेही महाविकास आघाडीने डोळसपणे पाहावे असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावल आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.