AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ अधिकाऱ्याकडून दीपालीच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न; ही आत्महत्या नवे तर हत्या: चित्रा वाघ

DCF शिवकुमार याच्याविरुद्धच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर दीपाली वाचली असती. | Chitra Wath Deepali Chavan Suicide

'त्या' अधिकाऱ्याकडून दीपालीच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न; ही आत्महत्या नवे तर हत्या: चित्रा वाघ
दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला.
| Updated on: Mar 26, 2021 | 12:16 PM
Share

मुंबई: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी (Woman RFO Suicide) दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या आत्महत्येनंतर आता भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. दिपाली चव्हाण यांना अपमानित करण्यात आले. भ्रष्ट व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला, असा हल्लाबोल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. (Chitra Wagh on Deepali Chavan Suicide)

चित्रा वाघ यांनी शुक्रवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे हरामखोर DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला, तिला अपमानित केल जात होतं, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

DCF शिवकुमार याच्याविरुद्धच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर दीपाली वाचली असती. ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

दीपाली चव्हाण यांच्या पत्रात गंभीर आरोप

ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.

रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या : 

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप

(Chitra Wagh on Deepali Chavan Suicide)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.