BIG BREAKING | शिंदे-फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट, दोन्ही नेते दिल्लीला जाण्याच्या तयारीत

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर आता वेगळ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट झाल्याची माहिती मिळत आहे.

BIG BREAKING | शिंदे-फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट, दोन्ही नेते दिल्लीला जाण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 7:39 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे आणखी घडामोडी घडू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज पहाटे पंढरपूरला विठ्ठल मंदिरात महापूजा संपन्न झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आज दुपारी सोलापूर दौऱ्यावरुन मुंबई विमानतळावर परतले. यावेळी देवेंद्र फडणवीस हे देखील मुंबई विमानतळावर दाखल झालेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांची गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे मुंबई विमानतळावरुन परस्पर दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जावू शकतात, अशी माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन बैठक

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यानंतर लगेच राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही पक्षांच्या गोटात जोरात हालाचाली घडत आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना डिवचण्यासाठीची एकही संधी सोडली जात नाही.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांकडून सातत्याने सत्ताधारी पक्षांवर टीका केली जात आहे. त्यामुळे आगामी सर्व राजकीय घडामोडी लक्षात घेऊन आता सरकारही मंत्रिमंडळ विस्तारासाठी पावलं उचलत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी राज्य सरकार महामंडळ वाटप करणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता दिल्लीत मंत्रिमंडळासाठी खलबतं होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

शिवसेनेतील अनेक आमदार हे राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्ताराची वाट पाहत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही यावरुन अनेकांनी याआधी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आमदार बच्चू कडू यांनी यावर थेट परखड मत मांडलं होतं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची क्षमता नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.