Cm Eknath Shinde : मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, 30 कोटींच्या निधीचा काढला जीआर, अण्णासाहेब पाटील महामंडळाची मागणी पूर्ण
अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याची मागणी मराठा संघटना आणि मराठा समाजाकडून करण्यात येत होती. ती मागणी मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तात्काळ निधी देण्याबाबत पाऊल उचलली आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं सरकार स्थापन केल्यापासून आणि राज्याच्या सत्तेचा गाडा हाती घेतल्यापासून राज्यात नव्या निर्णयांचा धडाका लावला आहे. तसंच ते जुन्या सरकारने (Uddhav Thackeray) घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेकही लावत आहेत. आजच त्यांनी 5020 कोटींच्या जीआराना स्थगिती देत ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का दिला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या निर्णय मराठा समाजाला (Maratha) आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी मराठा समाजासाठी 30 कोटींचा जीआर काढला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याची मागणी मराठा संघटना आणि मराठा समाजाकडून करण्यात येत होती. ती मागणी मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तात्काळ निधी देण्याबाबत पाऊल उचलली आहेत.
निधी मिळत नसल्याचा अनेकदा आरोप
मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यास मदत होते. मात्र तुकड्या निधीमुळे मराठा समाजाच्या अनेक मागण्या रखडल्या होत्या. तशा निविदा मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आल्या होत्या. त्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे आदेश वित्त नियोजनाच्या माध्यमातून काढले आहेत. त्याबाबत जीआर ही प्रसिद्ध करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला जास्तीत जास्त निधी मिळावा आणि मराठा समाजाला जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळून मराठा समाजाचा विकास व्हावा यासाठी मराठा समाज आग्रही आहे.
मराठा समाजाच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्वाची
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला निधी मिळत नसल्याचा आरोप वारंवार मराठा समाजाकडून होत आला आहे. त्यासाठी मराठा समाजाकडून अनेकदा आंदोलनही करण्यात आले आहे. तसेच खुद्द संभाजी राजे यांनी मुंबईत उपोषण करत काही मागण्या सरकार पुढे ठेवल्या होत्या. त्यावेळीही एकनाथ शिंदे यांनी जाऊन छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेतली होती. आणि त्यांचं उपोषण सोडण्याचे विनंती केली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री होण्याआधी पासून एक मोठा रोल राहिला आहे. आगामी काळात मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्या मुख्यमंत्री कशाप्रकारे हाताळतात हे येणारा काळच सांगेल.